
चंद्रपूर
गेली अनेक दिवस निवडणुकीची रणधुमाळी झाल्यानंतर काल प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली.काही तुरळक घटना वगळता अतिशय शांततेत मतदान पार पडले.परवा म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी कोण होणार आमदार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.दरम्यान शक्यतांचा बाजार जोरात सुरू आहे.कार्यकर्ते आपआपल्या परीने अंदाज देउ लागले आहेत.अनं आपलाच नेता कसा आमदार होईल हे सांगत आहेत.
2024 मध्ये संपन्न झालेली विधानसभा निवडणूक ख-या अर्थाने वेगळी ठरली.ग्रामपंचायत निवडणूकीप्रमाणे या निवडणूकीत पैशाचा बाजार मांडल्या गेला.अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आली.पैसे वाटतांना अनेकांना पकडण्यात आले.अनेकांचे व्हिडीओ देखिल वायरल करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हयातील सहा विधानसभा मतदारसंघात कोणत्या प्रमुख पक्षांचे पारडे जड राहतील कोण आमदार होणार.तर कुणाचा भ्रमनिराश होणार याकडेही अनेकांचे लक्ष आहे.



