
चंद्रपूर
राजुरा विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी झाली यात भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी विजय मिळवित इतिहास रचला.बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांना प्रचंड विरोध झाला.पण अशातही अखेरपर्यत हार न मानता त्यांनी केलेल्या नियोजनाला यश मिळाले.देवराव भोंगळेच्या विजयाने राजु-याचे आमदार सुभाष धोटे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.”विकासाचा वादा,देवराव दादा” असा नारा भाजपने दिला होता त्यात त्यांना यश आले आहे.
यावेळी राजूरा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक हि अतिशय रंजकदार ठरली.मतमोजणीच्या सुरवातीला शेतकरी संघटनेचे वामनराव चटप हे आघाडीवर होते.अनेक फे-यापर्यत त्यांनीच आघाडी घेतली होती.यावेळी भाजपचे देवराव भोंगळे हे तिस-या क्रमांकावर होते.काॅग्रेसचे सुभाष धोटे हे दुस-या क्रमांकावर होते.यानंतर मात्र चित्र बदलले अनं सुभाष धोटे यांनी मतांची मुसंडी मारली.दरम्यान काही फे-यानंतर पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली.अनं देवराव भोंगळे हे मतामध्ये आघाडीवर होते.
राजुरा विधानसभा मतदारसंघात आधीपासूनच कमालीची स्पर्धा निर्माण झाली होती.भाजपने देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर सुदर्शन निमकर,संजय धोटे व राजु-यातील भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता.पण अतितटीच्या निवडणुकीत शेवटी देवराव भोंगळे यांनीच विजय मिळविला.राजु-यातील प्रस्तापित नेत्यांवर मात करित ते आता राजुरा विधानसभा मतदारसंघाचे दादा झाले आहेत.विकासाचा वादा देवराव दादा असा नारा भाजपने देत निवडणूक लढविली होती.त्यात ते आता यशस्वी ठरले.
गोंडपिपरीच किंगमेकर
राजुरा विधानसभेतून निवडणूकीत विजयाचा मार्ग हा गोंडपिपरीतून जातोे असे म्हटल्या जाते.अनेकदा हे सिध्द झाले.आता देवराव भोंगळे यांच्या विजयाने पुन्हा ते एकदा सिध्द झाले.गोंडपिपरी राजुरा विधानसभेचे विजयी उमेदवार देवराव भोंगळे यांच्यासाठी किंगमेकर ठरली आहे.
असाही योगायोग
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघाची निवडणूक हि अतिशय चुरशीची झाली होती.शेवटच्या फेरीत सुभाष धोटे यांनी वामनराव चटप यांचा 2500 मतांनी पराभव केला होता.आताही तसाच योगायोग बघायला मिळाला.देवराव भोंगळे यांनी सुभाष धोटे यांचा 2200 मतांनी पराभव केला.



