Sunday, October 11, 2026

‘‘या’’ युवा नेत्याला मिळाली भाजपच्या नेतृत्वाची संधी

 

चंद्रपूर
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.लोकसभेत पराभव झाल्यानंतर भाजप पुन्हा नव्या दमाने कामाला लागली आहे.अशातच आज चंद्रपूर जिल्हयातील तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.भाजप जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा यांनी नवनियुक्त पदाधिका-यांच्या नावांची घोषणा केली.यात गोंडपिपरी तालुक्याच्या नेतृत्वाची दोरी दिपक सातपूते या युवा नेत्यावर सोपविण्यात आली आहे.

कोण आहेत सातपूते
दिपक सातपूते हे गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर देशपांडे येथील रहिवाशी आहेत.गेल्या पंधरा वर्षापासून ते सक्रिय राजकारणात आहेत.तेव्हापासूनच सातत्याने त्यांनी आपल्या गावात एकहाती सत्ता ठेवली आहे.काॅग्रेसमधून त्यांनी राजकारणाला सुरवात केली.पण पक्षाने केलेल्या अन्यायामुळे काँग्रेस ला रामराम ठोकत त्यांनी भाजपत नव्या दमाने आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली.यांनतर झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला.गोंडपिपरी पंचायत समितीचे सभापतीपदी विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला.सामान्यांच्या कामाला धा़ऊन जाणारा नेता अशी सातपूतेंची ओळख आहे.ख-या अर्थाने भाजपत काम करतांना त्यांनी आपल्या कामांची झलक दाखविली.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही सातपुतेंनी कमाल करित पक्षाला मतांची आघाडी मिळवून दिली होती.गोंडपिपरीच्या तालुकाध्यक्ष पदावर अनेकांचा डोळा होता.पण अनेक वर्षापर्यत नवीन अध्यक्षाची निवड करण्यात आली नव्हती.शेवटी आज जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा यांनी जिल्हयातील अनेक तालुकाध्यक्षांच्या नावंची घोषणा केली.दिपक सातपूते यांची पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी आंनद साजरा केला.

   यांची लागली वर्णी

राजुरा तालुका अध्यक्षपदी सुनिल उरकुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वामन तुरानकर, दिलीप गिरसावळे, बाळनाथ वडस्कर हे राजुरा तालुक्याचे महामंत्री असतील.सुरेश रागीट हे राजुरा शहराचे अध्यक्ष असतील. मिलिंद देशकर,सचिन डोहे, अनंता येरणे, श्रीनिवास पांझा यांना महामंत्रिपदी नियुक्त करण्यात आले आहे. कोरपना तालुक्याचे नवनियुक्त अध्यक्ष संजय मुसळे असतील. त्यांना महामंत्री म्हणून सतीश उपलेंचीवार, प्रमोद कोडापे, विजय रणदिवे हे सहाय्य करतील. गोंडपिपरी तालुकाध्यक्षपदी दीपक सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निलेश पुलगमकर, गणपती चौधरी, सतीश वासमवार हे महामंत्री असतील. जिवती तालुकाध्यक्ष म्हणून दत्ता राठोड यांची नियुक्त करण्यात आली आहे. येथे प्रल्हाद मदने, तुकाराम वारलवाड, माधव नेवळे, गोविंद टोकरे हे महामंत्री असतील.अर्जुन भोयर यांची नियुक्ती सावलीच्या तालुकाध्यक्ष पदावर करण्यात आली आहे. सतीश बोम्मावार, सचिन तंगडपल्लीवार हे सावलीचे महामंत्री असतील. सिंदेवाही तालुकाध्यक्ष म्हणून श्रीराम डोंगरवार हे काम पाहणार आहे. नागराज गेडाम, मुरलीधर मडावी हे येथे महामंत्री असतील.नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष श्री. हरीश शर्मा, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, अॅड. संजय धोटे, आदींनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!