
चंद्रपूर
खुर्च्या विकण्यासाठी राजस्थान राज्यातील पस्तीस लोकांचा समुह गोंडपिपरीत दाखल झाला.त्यांनी नगरातील चिंतामणी महाविद्यलयासमोर आपले बस्तान मांडले.दरम्यान विद्युत खांबावर आकोडे टाकून ते विजचोरी करीत होते.या प्रकाराची तक्रार काहींनी महावितरणकडे केली.अभियंत्याने चौकशी व कार्यवाहीसाठी चार लाईनमॅन ला घटनास्थळी पाठविले.ते तिथे गेले.चौकशी सुरू झाली मग काय राजस्थानी लोकांच्या घोळक्यांनी या चैघांनाही मारहाण केली.यात दोेघे गंभीर जखमी झाले. दोघे बाल बाल बचावले.काल रात्री हा प्रकार घडला.आता या प्रकरणी गोंडपिपरी पोलीसात राजस्थानच्या तब्बल सतरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंडपिपरी शहरात सध्या परप्रातींयाची संख्या कमालीची वाढली आहे.राजस्थान येथील 35 लोकांचा समुह गांेडपिपरी येथे खुर्च्या विकण्यासाठी आला.गोंडपिपरी येथील चिंतामणी महाविद्यालय परिसरात त्यांनी आपला डेरा ठोकला.दरम्यान विद्यूत पोलवर तारा टाकून चोरीच्या मार्गाने ते विद्यूत पुरवठा करित होते.काही लोकांच्या लक्षात हा प्रकार आला.त्यांनी महावितरणचे सहायक अभियंता ढवस यांच्याकडे याप्रकाराची तक्रार केली.यानंतर ढवस यांनी क्विक एक्शन घेतली.त्यांनी तातडीने रवि जांभूळकर,प्रेमानंद गौरकार,हिराजी ठेंगणे,किशोर बोरकुटे यांना घटनेचा तपास व कार्यवाही करण्यासाठी पाठविले. काल रात्री तिथे पोहचले असता सदर तक्रारीत तथ्य आढळून आले
त्यांनी सदर घटनेची पुराव्यासाठी फोटोग्राफी केली.सोबत व्हिडीओ देखिल घेतले.याचदरम्यान राजस्थानी लोकांच्या समुहाने त्यांच्यावर आक्रमण केले.यात रवि जांभुळकर,व किशोर बोरकुटे गंभीर जखमी झाले.तर गौरकार व ठेगंणे यांनाही किरकोळ मारहाण झाली.रवि जांभुळकर यांना जास्त मार असल्याने त्यांना चंद्रपूरात दाखल करण्यात आले.तर बोरकुटे यांच्यावर गोंडपिपरीत उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती कळताच महावितरण विभागात एकच खळबळ माजली.महावितरणच्या अधिका-यांनी तातडीने गोंडपिपरी पोलीसांना यासंदर्भातील तक्रार दाखल केली.गांेडपिपरीचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे यांनी तातडीने घटनास्थळ गाठत सदर प्रकरणी कार्यवाही केली.सोबत या प्रकरणातील तब्बल सतरा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास सुरू आहे.



