
चंद्रपूर:-
हातात फाईलांचा गठठा अनं सोबत गावातील दहा विस तरूण अनं वृध्द……! रोज गावातून पंचायत समितीत यायचे,तहसिल गाठायची अनं मगं त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी वाटेल ती भूमिका घ्यायची वेळप्रसंगी अधिका-यांनाही सुनवायच.एकदा विषय हाती घेतला कि तो मार्गी लागायलाच हवा.गावातील कुणाचेही काम अडायला नको यासाठी प्रशासनाशी भांडायच.चंद्रपूर जिल्हयातील तेलंगणाला सिमेवरील गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर येथील दिपक सातपूते यांचा राजकीय प्रवास एक एक यशाचा टप्पा गाठणारा ठरला आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातील दिपक सातपूते हे गेल्या पंधरा वर्षापासून सक्रिय राजकारणात आहेत.ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास उपसरपंच,सरपंच,पंचायत समिती सभापती ते आता भाजपच्या तालुकाध्यक्षापर्यत पोहचला.आपल्या गावाबाबत कमालीचा संवेदनशिलता बाळगणारा हा युवा नेता आता तालुक्यात पक्षाचे नेतृत्व करित आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला हार पत्करावी लागली होती.पण दिपक सातपूतेच्या नेतृत्वात सोनापूरात भाजपला मतांची आघाडी मिळाली होती.विधानसभा निवडणुकीतही भाजपची रनणीती यशश्वी ठरली.भाजपला गोंडपिपरी तालुक्यातून पहिल्यांदाच बहूमत गाठता आले.अनं आमदार देवराव भोंगळे हे विजयी झाले.दिपक सातपुतेच्या अध्यक्षपदात शेकडो नेते अनं कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत कामात आली.
देवराव भोंगळे आमदार झाल्यानंतर आता भाजपच्या कार्यकर्त्यांत कमालीचा जोश निर्माण झाला आहे.येणारी जिल्हा परिषद,पंचायत समितीची निवडणूक ताकदीने लढवून विजयी होण्यासाठी आतापासून तयारी सुरू झाली आहे.दिपक सातपुते या युवा नेत्याच्या खादंयावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर मोठी युवाशक्ती पक्षासोबत जुळली आहे.मनात जिदद,परिश्रम करण्याची तयारी,सामान्यांशी असलेला दांडगा संपर्क लोकांच्या सुखदुखात सहभागी होण्याची वृत्ती,आर्थीक भक्कमता हि राजकारणातील हि राजकारणातील यशाची पंचसुत्री मानल्या जाते.दिपक सातपूते यांनी हि पंचसुत्री साधली.अनं यशाचा एक एक टप्पा गाठत ते आपली वाटचाल करित आहेत.
“दिपक सातपूते यांच्यासारख्या उमदया युवा नेतृत्वाला पक्षाने तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.हि जबाबदारी ते तेवढयाच ताकदीने पेलत आहेत.
राकेश पून,अध्यक्ष भाजमुयो,गोंडपिपरी
[ CHANDAGAD INTATIVE ]



