
चंद्रपूर
चंद्रपूरात सध्या ‘‘वारां’’चा जिल्हा झाला आहे.जिल्हयातील सहापैकी तब्बल तिन आमदार हे वार आडनावाचे आहेत.विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांना जेव्हा आम्ही अध्यक्षपदाचे निमंत्रण दयायला गेलो होतो.तेव्हा वारांना मंत्रीपद मिळाले पाहिजे असं ते म्हणाले होते.आता मंत्रीमंडळातील एक मंत्रीपद खाली आहे.तेही वारांनाच मिळाले पाहिजे असे आमदार किशोर जोरगेवारांनी म्हणताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकडले वार इकडे येउ शकतात असे म्हणत काॅग्रेसच्या माजी विरोधी पक्षनेते तथा वार परिवारातील विजय वडेटटीवार यांना खुलीच आॅफर दिली.दरम्यान मी देखिल ‘वार’’ असे सांगत मंत्रीपदाची आपली सुप्त इच्छा जोरगेवारांनी बोलून दाखविली.आज महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मा.सा.कन्नमवार यांचा शतकोत्तर जयंतीमहोत्सव सोहळा चंद्रपूरात पार पडला.यावेळी या संपूर्ण प्रकाराच्या अनुभूतीने राजकारणात काहीही होउ शकते याबाबत आता चर्चा सुरू झाल्या.
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यादांच चंद्रपूरात आले होते.यानिमीत्ताने हा विशेष सोहळा आयोजीत करण्यात आला होता.चंद्रपूरात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम माता महाकाली मंदीरात प्रवेश करित दर्शन घेतले.यानंतर येथील प्रियदर्शीनी सभागृहात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव जयंतीनिमीत्ताने कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार तर अध्यक्षस्थानी माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेटटीवार,राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,खासदार प्रतीभा धानोरकर,आमदार देवराव भोंगळे,आमदार सुधाकर अडबाले,प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जान्सन,आयुक्त विपील पालीवाल,माजी आमदार सुदर्शन निमकर,संजय धोटे,खुशाल बोंडे यांच्याच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
तुलनेने अतिशय मागास असलेल्या कष्टकरी समाजात दादासाहेब कन्नमवार यांनी जन्म घेतला, मात्र स्वत:च्या मेहनतीवर त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. दादासाहेब हे ध्येयवादी नेते होते. राज्याचा आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन ते संपूर्ण जीवन जगले. अशा नेत्यांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे मनोगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मी आधी बोलतो ना..
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील असे संचालनकर्त्यानी सांगितल्यानंतर मी अध्यक्ष असलो तरी आधीच बोलून घेतो ना.असे सांगत विजय वडेटटीवार यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.त्यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतूक केले.सोबत देवेंद्र फडणवीस हे मोदींचे वारसदार व्हावे असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.जोरगेवार बाजुची खुर्ची घेण्यात पटाईत असल्याचेही ते म्हणाले.
मुनगंटीवारांची ‘‘दांडी’’
मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रीमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमात जाणे टाळले होते.यानंतर ते कमालीचे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या.स्वतः मुनगंटीवारानी मला मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे असं मला सांगितल्या गेलं.पण ऐनवेळी नाव कापण्यात आलं.हे नाव कुणी व का कापल याची माहिती आपणास हवी आहे असदेखिल ते म्हणाले होते.आज चंद्रपूरात दस्तुरखूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हयात असतांना सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र या कार्यक्रमाला दांडी मारली.आता याचीही चर्चा होत आहे.
जोरगेवारांनी मारली बाजी...
आजच्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार हे स्वागताध्यक्ष होते.त्यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतूक केले.सोबत गुवाहाटीचाही संदर्भ दिला.फडणवीस हे चंद्रपूरचे भूमीपूत्र आहेत.त्यांनी गडचिरोलीसोबत चंद्रपूरचेही पालकत्व स्विकारावे अशी विनंती केली.अधिवेशनाच्या काळात केवळ एका चिठठीवर चंद्रपूरच्या दिक्षाभूमीसाठी त्यांनी निधी मंजूर केल्याच्या आठवणीचा प्रसंग त्यांनी सांगितला.दरम्यान किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांची वाढती जवळीक चंद्रपूरच्या राजकारणाला कोणता रंग देेते हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.



