
चंद्रपूर:–
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाने काॅग्रेस गोटात कमालीचा अनुत्साह आहे.काॅग्रेसचे एक एक नेते आता वेगळा मार्ग धरू लागले आहेत.काल याचाच प्रत्यय काॅग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना बघायला मिळाला.पराभवानंतर पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आता स्थानिक स्तरावर खांदेपालट करण्यात येत आहे.नवीन नेतृत्वाला संधी देउन नवी बांधणी करण्याचा संकल्प आहे.चंद्रपूरातील गोंडपिपरी तालुक्यातील काॅग्रेसच्या तालुकाध्यक्षाची निवड करण्यासाठी सिमेवरील पोडसा गावात एक बैठक बोलविण्यात आली होती.
या बैठकीत काॅग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.याचदरम्यान काही शुल्लकशा कारणावरून शाब्दिक वाद झाला.देवेंद्र बट्टे हे काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.त्यांनीही बैठकीत सहभाग घेतला होता.दरम्यान पोडस्याचे सरपंच तथा काॅग्रेस नेते देविदास सातपूते यांनी तालुकाध्यक्षाची जबाबदारी घ्यावी असा सूर निघाला.याचवेळी बट्टे व काॅग्रेसच्या संजय झाडे यांच्यात वाद झाला. याच वादानंतर बट्टे यांनी या बैठकीतून पाय काढता घेतला.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र बट्टे होते.पण आपला अपमान करण्यात आला असे सांगत संतापलेले बट्टे तातडीने बैठक सोडून गावाकडे परतले.मग काय आज सकाळीच त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाव्दारे एक संदेश प्रसारित करीत बट्टे यांच्या समर्थनांत भूमिका मांडली.अनं या अपमानामुळे आता काॅग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्याचे सांगण्यात आले.स्वतं बट्टे यांनी अशा प्रकारामुळे आपण व्यथीत झाल्याने आपण आता या पक्षात न राहण्याचा निर्णय घेत असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.
राजुरा विधानसभेच्या निवडणुकीत सुभाष धोटे यांच्या पराभवानंतर अनेक नेते पक्ष सोडू लागले आहेत.काॅग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष निलेश संगमवार हे नुकतेच भाजपत गेले. आता बट्टे यांनी देखिल हा निर्णय घेतला आहे.देवेंद्र बट्टे हे गेल्या अनेक वर्षापासून काॅग्रेस पक्षात आहेत.त्यांनी विविध पद भुषविली आहेत.सध्या ते पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षावर कार्यरत होते.येत्या दोन दिवसात आपले अनेक समर्थक पक्ष सोडणार असल्याचा दावा बट्टे यांनी केला आहे.



