Sunday, June 28, 2026
spot_img

‘‘हा’’ फोटो होतोय जोरदार वायरल…….. लोक म्हणताहेत,हा तर “भैय्यां “चा “मास्टर”स्ट्रोक…!

चंद्रपूर:-

विजयाचा बुलंद नारा देत हात दाखविणारे हंसराज अहीर अनं राज्याचे आदिवासी विकास मंत्री डाॅ.अशोक उईके यांचा सोबत असलेला फोटो कालपासून चांगलाच वायरल होत आहे.काल उशिरा राज्यातील प्रत्येक जिल्हयाच्या पालकमंत्री पदाच्या नावाची घोषणा करण्यात आली.यात चंद्रपूरच्या पालकमंत्रीपदी यवतमाळ जिल्हयाचे डाॅ.अशोक उईके यांना चंद्रपूरचे पालकत्व देण्यात आले.यानंतर दोघांच्या जोडीचा फोटो वेगाने वायरल होत आहे.माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात वेगाने व्यक्त होत आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांची इच्छा नसतांना त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली.यात त्यांचा दणदणीत पराभव झाला.विधानसभा निवडणुकीत चंद्रपूरची जागा ब्रिजभूषण पाझारे यांना मिळावी यासाठी मुनगंटीवारांनी शेवटपर्यत शक्ती पणास लावली.पण त्यांना यश आले नाही.किशोर जोरगेवारांना भाजपत प्रवेश देत उमेदवारी दिली गेली.त्यांनी यावेळी दुस-यांदा विजयाचा पताका रोवला.विधानसभा निवडणुका पार पडल्या.यात भाजपला बंपर विजय मिळाला.

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले.मात्र सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळात स्थान मिळू शकले नाही.मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे.यादीत तूमचे नाव आहे असं सांगण्यात आलं.पण ऐनवेळी आपल नाव कुणी व का कापल असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली.सोबत मंत्रीमंडळाच्या शपथविधीलाही जाणे टाळले होते.
अगदी काही दिवसापुर्वीच चंद्रपूरात कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांचा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विजय वडेट्टीवार,हसंराज अहीर,आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत चांगलीच केमेस्ट्री बघायला मिळाली होती.याही कार्यक्रमात सुधीर मनुगंटीवार यांनी अनुपस्थिती दर्शविली होती.दरम्यान यानंतर विसापूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आमदार जोरगेवार व इतरांना आउटसाईड करण्यात आले.मुनगंटीवार,जोरगेवार या दोन “वारां”च्या श्रेयवादाच्या लढाईची चर्चा चंद्रपूरच्या राजकीय गल्लीत चांगलीच रंगू लागली आहे.

दरम्यान काल रात्री उशिरा राज्यातील संपूर्ण जिल्हयातील पालकमंत्री पदाची घोषणा करण्यात आली.यात चंद्रपूरच्या पालकमंत्रीपदी यवतमाळ जिल्हातील आमदार तथा आदिवासी विकास मंत्री डाॅ.अशोक उईके यांना चंद्रपूरचे पालकमंत्री पद देण्यात आले.त्यांना पालकमंत्रीपद मिळताच आता केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार हंसराज अहीर यांच्या सोबत उईकंेंचा सोबत असलेला फोटो जोरात वायरल होत आहे. आमदार किशोर जोरगेवारांना भाजपात प्रवेश देण्यापासून सुरू झालेली अहीरांच्या मास्टरस्ट्रोची चर्चा आता उईकेंच्या पालकमंत्रीपदानंतर वेगाने सुरू झाली आहे.मुख्यमंत्री फडणवीस,हंसराज अहीर अनं आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाढते सख्य चंद्रपूरच्या राजकारणाची नवी नांदी तर नाही असाही सुर राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!