Monday, October 12, 2026

विषय शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्याचा …आता ‘‘या’’ शब्दप्रयोगावरून होताहेत वार प्रतीवार

चंद्रपूर:-

गावात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याचे नियोजन करण्यात आले.महाराजाच्या पुतळयासाठी जागाही निश्चीत झाली.अलीकडे पुतळा मांडण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट झालीय.गावक-यांनी सुरवातीला प्रयत्न केले.पण नियमानुसार पुतळा मांडणे एवढी साधी बाब राहिली नाही हे समजल्याने त्यांनी गावात महाराजांचा पुतळा मांडला.प्रशासनाकडे तक्रार झाली.अनं मग काय त्यांनी पुतळा झाकण्याची कारवाई करण्यात आली.गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.पण मग समन्वयातून तोडगा निघाला.अनं गावात शांतता पसरली.अशात पुन्हा एकदा हा मुदा ऐरणीवर आला.पुतळा खुला न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा अशोक रेचनकर यांनी दिला.यावेळी त्यांनी आपल्या निवेदनातून काही शिवद्रोही असा उल्लेख केला.अनं पुन्हा हा मुददा ऐरणीवर आलाय.दरम्यान गावात शांतता असतांना रेचनकरांनी वादग्रस्त विधान करून गावातील शांतता भंग केली.यामुळे त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी संतोष मुगलवार यांनी केली.गावातील अनेक नागरिकांनी आज प्रशासनाला निवेदन देत या प्रश्नाकडे लक्ष वेधले.यामुळे आता सकमुरातील या प्रकाराची चौफेर चर्चा सुरू झालीय.

सकमुर येथील पुतळा प्रकरणी समस्त गावकऱ्यांनी समन्वयाची भूमिका घेतली.यामुळे गावात शांततेचे वातावरण आहे.पण आता अशोक दादाजी रेचनकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.सोबतच माध्यमातुन बातम्या प्रसिद्ध करीत “शिवद्रोही” अशी उपमा वाफरीली. मुळात या प्रकाराने गावातील शांतता व सुव्यवस्था बिघडयाची स्थिती निर्माण झाली आहे. यात दोषी असलेल्या अशोक रेचनकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी
संतोष मुगलवार, सकमूर

सकमुर येथील समस्त गावकऱ्यांची जनभावना लक्षात घेता शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा झाकलेला पुतळा प्रशासनाने तातडीने खुला करुन द्यावा. अन्यथा आता आम्ही गावकरी आमरण उपोषण करणार आहोत
अशोक रेचनकर,सकमुर.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!