Sunday, October 11, 2026

बंडू हजारे एक्टिव्ह मोडवर,आता हि, मंडळी गेली शिंदेंच्या शिवसेनेत…..!

चंद्रपूर
कोण कधी कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नाही.चंद्रपूरातील गोंडपिपरी नगरपंचायतीवर काॅग्रेस व मित्रपक्षांनी मिळून सत्ता बसविली.पण आता सत्ताधारी पक्षातील चक्क सहा नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एन्ट्री मारली आहे.मुंबईच्या सहयाद्रीवर काल झालेल्या एका कार्यक्रमात हा उपक्रम पार पडला.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बंडू हजारे,उपजिल्हाप्रमुख नितीन धानोरकर यांनी यासाठी जोरदार फिल्डींग लावली.अनं ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षासह काॅगंे्रसच्या नगरसेवकांना गळाला लावले.यामुळे आता गोंडपिपरी नगरापंचायतीवर सत्ता कोणाची असेल.काही राजकीय समीकरण बदलतील का याचीच चर्चा सुरू झाली आहे.

 

सध्या अदलाबदलीचा दौर सुरू आहे.लोकसभा निवडणुकीनंतर काॅग्रेसला उच्छे दिन येतील अशी अपेक्षा होती.मात्र विधानसभा निवडणुकीत काॅग्रेसला दारूण पराभवाचा सामना कराव लागला.अनपेक्षित निकाल आल्याने दाणादाण झाली.राज्यात भाजप व मित्रपक्षाचे सरकार आहे.मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री झाले आहेत.
चंद्रपूरात शिंदेच्या शिवसेनेची फारशी ताकद नाही.पण त्यांच्या नेत्यानी आत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पूर्ण ताकद झोकली आहे.पक्षाचा एकही नगरसेवक नसतांना सहा नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.आता याचीच चर्चा जोरात सुरू आहे.जिल्हाप्रमुख बडंू हजारे व उपजिल्हाप्रमुख नितीन धानोरकर यांनी जोरदार फिल्डींग लावली अंन नगरपंचायतीच्या तब्बल सहा नगरसेवकांना शिंदे गटात प्रवेश करायला मुंबईत घेउन गेले.गोंडपिपरीच्या उपनगराध्यक्षा सारीका मडावी,सुरेश चिलनकर,वनिता वाघाडे,वनिता देवगड,सुनील संकूलवार यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.गोंडपिपरी नगरपंचायतीत काॅग्रेसची सत्ता आहे.राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आता गोेडपिपरीत मात्र शिंदे गटाने चमत्कार केला आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!