Sunday, June 28, 2026
spot_img

माझी “खुर्ची” हिसकल्या गेली….! सुधीर मुनगंटीवार यांनी अशी व्यक्त केली खदखद

चंद्रपूर:-

भाजपचे जेष्ठ नेते,तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेले,राज्याची तिजोरी सांभाळणारे,वनमंत्री म्हणून विश्वविक्रम करणारे सुधीर मुनगंटीवार यांनी आज शेवटी आपल्या मनातील खदखद सार्वजनिक ठिकाणी बोलूनच दाखविली.माझी “खुर्ची” हिसकल्या गेली.पण नव्या संसदेत येत्या काही दिवसात ज्या ठिकाणी पंतप्रधान बसतील ती “खुर्ची” मात्र माझ्याच विधानसभा मतदारसंघातून गेलेली राहील असे ते म्हणाले.

नागपूर फ्लाइंग क्लबच्या चंद्रपूर शाखेचा तथा पायलट ट्रेनींगच्या उदघाटनाचा सोहळा राजीव प्रताप रूढी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
भाजपचे जेष्ट नेेते सुधीर मुनगंटीवार यांची विकासाची दृष्टी मोठी आहे.त्यांनी जिल्हयात विविध विकासांची कामे केलीत.एसएनडीटी विद्यापीठ,सैनीक स्कूल,वन अॅकाडमी,बाॅटनिकल गार्डन,ताडोबा,कॅन्सर हास्पीटल,जिल्हयात हजारोंच्या संख्येने वाढलेले पर्यटक हा सुधीर मुनगंटीवार यांच्याच संकल्पनेचा परिणाम आहे.

राज्यात बहुमतात भाजपाची सत्ता आली.पण सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळातून वगळले गेले.एवढया जेष्ठ नेत्याला मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने अनेकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.पण सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रीपद न मिळाल्याची खदखद आहेच हे आज स्पष्ट झाले.भाजपचे सात वेळा खासदार असणारे राजीव प्रताप रूढी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.यावेळी आमदार किशोर जोरगेवार,जिल्हाधिकारी विनय गौडा यांची उपस्थिती होती.चंद्रपुरात आता पायलट ट्रेनीेंग होणार असल्याने पुन्हा एकदा चंद्रपूरला सुवर्णसंधी मिळणार आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!