
चंद्रपूर:-
राज्याचे माजी वने,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आपल्या भाषणाची सुरवात ‘‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’’ हा नारा देत करतात.अर्थातच महाराजांविषयी त्यांची अस्सीम श्रध्दा आहे.यातुनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन करण्यासाठी विविध निर्णय घेतले अनं अंमलातही आणले.लंडन येथील महाराजांची वाघनख भारतात परत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांचे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विशेष प्रेम आहे.पण विशेषकरून सातारकरामध्ये त्यांच्याविषयी विशेष आपुलकी आहे.असे सांगत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज ना.शिवेंद्रराजे भोसले यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुक केले.
ना.शिवेंद्रराजे भोसले आज चंद्रपूर जिल्हयाच्या दौ-यावर होते.याप्रसंगी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपल्या घरी आल्याने त्यांचे यावेळी सुधीर मुनंगटीवार त्यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार व परिवाराकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मार्गदर्शक मुनगंटीवार
याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलतांना ना.शिवेंद्रराजे भोसले यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला.सुधीर मुनगंटीवार हे फक्त आमदार नसून ते आमचे नेते आहेत.अनेक आमदारांना सुधीर मुनगंटीवार यांच्या कामाच्या धडाक्याची प्रचंड उत्सुकता असते.त्यांचा अभ्यास दांडगा असून त्यांच्याकडे मोठा संदर्भठेवाही आहे.ते मंत्रालयात गेले कि सर्व विभागाचे अधिकारी अलर्ट मोडवर येतात.त्यांचा अभ्यास संपूर्ण महाराष्ट्राने अलीकडेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात बघितला आहे.जे चूक आहे त्याला चुकच म्हणावी हा त्यांचा स्वभावगूण अनेकांना भावणारा आहे.ते सरकार,मंत्रीमहोदयांची चुक निदर्शनात आणून ती कशी दुरूस्त करता येईल यासाठीही मदत करतात असे ना.शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.


