सतत संशोधन करून सामान्यांचे मुलभूत प्रश्न नेमके कोणते आहेत.त्यावर आपणाकडून कसा तोडगा काढता येऊ शकतो.यासाठी दिवसरात्र एक करणारे,अभ्यासू,समाजशिल अनं तेवढेच कटिबध्द.एकदा एखादयाला शब्द दिला कि,तो पूर्ण व्हायलाच हवा हा मनीभाव बाळगणारे,विकासाबाबत कमालीची कल्पकता अनं त्याचा होणारा प्रत्यक्ष साक्षात्कार,राज्याचे तडफदार नेतृत्व,परफेक्ट संघटक,चंद्रपूर जिल्हयाच्या विकासाची उंची वाढविणारे,अभ्यासू,चिंतनशील,राज्याचे माजी अर्थमंत्री,वनमंत्री,सांस्कृतिक मंत्री लोकनेते,विकासपुरूष,आदरणीय आमदार सुधीरभाउ मुनंगटीवार यांचा आज वाढदिवस आहे.त्यांच्या वाढदिवसानिमीत्ताने ‘‘जन्मोत्सव लोकनेत्याचा’’ हा कोट देत विविध उपक्रमांची मालिका गेल्या चार दिवसांपासून राबविण्यात येत आहे.आदरणीय सुधीरभाउंना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा….. !
विस टक्के राजकारण अनं ऐंशी टक्के समाजकारण,सुधीरभांऊची हि वाटचाल अनेकांना प्रेरणेची मशाल ठरली आहे.आपल्या जिल्हयाचा,मतदारसंघाचा विकास कसा करायचा हे त्यांना चांगलच ठाऊक आहे.राज्याचे अर्थमंत्री असतांना त्यांनी राज्यभर आपल्या कामाच्या माध्यमातून विकासाची नवी परिभाषा मांडली.याच काळात त्यांनी चंद्रपूर जिल्हयात विविध क्षेत्रातील विकासकामे केलीत.एस.एन.डी.टी विघापीठाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हयाला मोठी देण दिलीय.बाॅटनिकल,गार्डन,कॅन्सर हास्पिटल,ताडोब्याला जागतिक स्तरावर पोहचविण्यासाठी प्रभावी नियोजन,जैविक शाळा,वन एकाॅडमी,सैनिक शाळा,बांबू रिसर्च अॅन्ड ट्रेनीेग सेंटर यासोबत आपल्या मतदारसंघात लक्षवेधी ठरणारी तिनशे मोठी काम केलीत.त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येत असलेला पोंभुर्णा तालुका.कधीकाळी अतिशय दुर्लक्षीत,अविकसीत असलेला हा तालुका आज समृध्द होउ घातला आहे.अनं याकरिता कारणीभूत ठरलंय सुधीरभाउंच्या विकासाचा दृष्टीकोन.अन त्यांच व्हिजन. पोंभूर्णा तालुक्याचा चेहरामोहरा बदलविण्याच काम भाऊंनी केल.मंत्री असतांना तर त्यांनी मोठा निधी तालुक्याच्या विकासाला दिला.पण आता आमदार असतांनाही ते या तालुक्याच्या विकासाकरिता आपली सांसदीय आयुधांचा प्रभावी वाफर करीत आहेत.नुकताच त्यांच्या पुढाकारातून पोंभुर्णा येथील एम.आय.डी.सी चा मार्ग मोकळा झाला.विविध विकासकामांसाठी त्यांनी 167 कोटी रूपयाचा निधी मंजूर करवून घेतला.मंत्रीपद असो वा नसो आपल्या सांसदीय आयुधांचा आपण समाजाच्या हितासाठी कसा प्रभावी वाफर करू शकतो.याचे अतिशय प्रेरणादायी उदाहरण म्हणजेच सुधीरभाऊ आहेत.नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर शासनाला अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यासाठी केलेल्या सुचना अतिशय प्रभावी ठरल्या.
ख-या अर्थाने लोकनेते,विकासपुरूष असलेल्या आमच्या आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या अनेक मंगला कामना….
हरिष ढवस मोबा. – ८९७८०१६६०
तालुकाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी,पोंभुर्णा.


