
चंद्रपूर:-
काॅग्रेस पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आता देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.लोकसभा निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केली.मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात पराभवाचा सामना करावा लागला.अशात आता राज्यात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होउ घातल्या आहेत.या पार्श्वभूमीवर पक्षाने अनेकांना नेतृत्वाची संधी दिली आहे.चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅकेचे अध्यक्षपद भुषविणारे काॅग्रेसचे जेष्ठ नेते संतोषसिंह रावत यांची महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीमुळे चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढू शकते असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
संतोषसिंह रावत हे काॅग्रेसचे जेष्ठ नेते आहेत.गेल्या अनेक वर्षापासून ते सक्रिय राजकारणातून काम करित आहेत.चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅकेचे ते अध्यक्ष राहिले आहेत.या संपूर्ण काळात त्यांनी आपल्या कार्याने आपला वेगळा ठसा उमटविला आहे.गेल्या दहा वर्षात देशात मोदी लाट होती.अनेकांनी पक्ष बदलविले.पण अशा स्थितीत ते काॅग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहिले.
राज्यात येणा-या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे.अशात सत्ताधारी भाजप व महायुतीला धक्का देण्यासाठी काॅग्रेसने आता पक्षात मोठे बदल केले आहेत.जे कार्यक्षम आहेत.त्यांना मोठी संधी मिळाली आहे.अशात संतोषसिंह रावत यांना महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी संधी देण्यात आली आहे.रावत यांचा ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क आहे.सामान्यांशी आपुलकी हे त्यांच वैशिष्टे असल्याच त्यांचे कार्यकर्ते सांगतात.त्यांच्या निवडीमुळे पक्षाला चांगला फायदा होउ शकतो.
मुनगंटीवारांविरोधात लढविली होती निवडणूक
2024 ची विधानसभा निवडणूक अनेक मुद्द्यांवर गाजली होती.भाजपचे मातब्बर नेते सुधीर मुनगंटीवार यांचा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ आहे.या निवडणुकीत मुनगंटीवार यांच्याविरोधात संतोषसिंह रावत यांनी उमेदवारी दाखल केली होती.अर्थात ते काॅग्रेसचे उमेदवार होते.रावत यांनी मुनगंटीवारांना कडवी झुंज देत तब्बल 80 हजार मते घेतली होती.या निवडणुकीत मतांचे विभाजन झाल्याने मुनगंटीवारांना विजय मिळविता आला होता.


