Sunday, June 28, 2026
spot_img

लोक म्हणू लागले,असे असावेत नेते ..! शिक्षक आमदार अडबाले यांचा “फैसला ऑन द स्पाॅट”

चंद्रपूर:-

शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात.शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासोबतच त्यांचे कामगारांना न्याय मिळवून देण्याासाठीचे मोठे योगदान राहिले आहे.अशात आज त्यांनी ‘‘फैसला ऑन द स्पाॅट’’ करित चौघांना मोठा दिलासा दिला.आमदार अडबाले यांच्या या तडकाफडक निर्णयाची सर्वत्र स्तुती होत आहे.
माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या आस्थापनेची तात्काळ चौकशी करण्यात यावी व जे अधिकारी, कर्मचारी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रकरणे वेळेत निकाली काढण्यास महाराष्ट्र सेवा हमी कायदा २०१५ चे उल्लंघन करीत असतील, त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याच्या सूचना बुधवारी पार पडलेल्या सहविचार सभेत आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. पातळे यांना दिल्या.

आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या उपक्रमाअंतर्गत शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. चंद्रपूर यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभा बुधवारी मा. सा. कन्नमवार सभागृह, चंद्रपूर येथे पार पडली. यावेळी ४ प्रकरणांना ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले. मागील प्रत्येक सभेत ‘ऑन द स्पॉट’ प्रकरणे निकाली काढली जात असल्याने आमदार सुधाकर अडबाले यांच्या कामगिरीवर शिक्षक – कर्मचाऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.

सभेत प्रवीण धोटे (नेहरू विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर) यांना मुख्याध्यापक पदास सुधारित वेतन श्रेणी, दर्शन गोरंटीवार (जनता विद्यालय पोंभुर्णा), योगेश पाचभाई, प्रीती लांडे (जनता विद्यालय चंद्रपूर) यांना शिपाई पदास सेवासातत्यास ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले.

सभेत जिल्ह्यातील अनुकंपा प्रकरण, मान्‍यता वर्धित व मंडळ मान्‍यताबाबत, शिक्षक – कर्मचाऱ्यांचे समायोजन, वेतन, वैद्यकीय देयके, वरिष्ठ / निवड श्रेणी अश्या ७० च्यावर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!