Sunday, June 28, 2026
spot_img

बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे एक्टीव्ह मोडवर

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष झाल्यानंतर रविंद्र शिंदे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह मोडवर आले आहे.मध्यवर्ती बॅक हि शेतक-यांची आहे.सर्वसामान्य जनतेची,महिलांची आहे.त्यांच्या आर्थीक विकासासाठी गावागावात जनजागृती केली जात असून शासनाकडून बॅकेच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांना व्हावी व ख-या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी आता नव्या उमेदीने काम सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह बॅकेची 40 वी वार्षीक सर्वसाधारण बैठक चंद्रपूरातील बॅकेच्या मा.सा.कन्नमवार सभागृहात पार पडली.यावेळी विविध योजनांची वैशिष्टयपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली.

महिला बचत गटाला आर्थीकदृष्या सक्षम करणे यासाठी आता नवीन धोरण राबविण्यात येणार आहे.याअंतर्गत बचत गटांना सहा लक्ष रूपयाचे कर्ज देण्यात येणार आहे.बॅकेच्या कुठल्याही शाखेचा शाखाअधिकारी सदर गटांचा अभ्यास करून तिन लक्ष रूपयाची कर्ज देऊ शकतो तर विभागीय कार्यालयांअंतर्गत अधिका-यांना चार लक्ष रूपयापर्यतचे कर्ज देण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत.चंद्रपूर जिल्हातील मध्यवर्ती सह बॅक हि अतिशय महत्वपूर्ण बॅक आहे.यामाध्यमातून शेतकरी बांधवांसोबत महिला बचत गटांना अधिक आर्थीक सक्षम बनविणे हा आपला हेतू असल्याचे यावेळी रविंद्र शिंदे यांनी नमूद केले.

शेतक-यांसाठी विकासासाठी विविध उपक्रम 
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅक हि ख-या अर्थाने शेतकरी बांधंवाची बॅक आहे.त्यांचा आर्थीक विकास करण्यासोबत अडीअडचणीच्या काळात त्यांना मदतीचा हात देेणे आमचे कर्तव्य आहे.बॅकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना आहेत.पण अनेकांना त्याची माहिती होत नाही.आता आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यत या योजना कशा पोहचतील यासाठी आम्ही आता प्रभावीपणे नियोजन करित आहोत.बॅकेच्या विविध शाखांच्या वतीने जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
उल्हास करपे,संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅक,चंद्रपूर.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!