
चंद्रपूर:-
पैसे कमविण्याच्या नादात कोण,कुठली अनं कशी चारसौबीसी करणार याचा नेम नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ या गावातून एक मोठा प्रकार समोर आला आहे.अतिवृष्टीची मदतीच्या नावावर ज्यांना शेती नाही.त्यांचे बोगस सातबारे तयार करून लाखो रूपयांचा मलींदा खाण्यात आला. युवा नेते वैभवपिंपळशेंडे यांनी पुराव्यानिशी सादर केलेल्या खळबळजनक दाव्याने प्रशासनातील अनेकांची आता पुरती वाट सुटली आहे.या सगळया भानगडीचा मास्टरमांईंड कोण याचे उत्तर आता प्रशासनासह सत्ताधा-यांना दयावे लागणार आहेत.दरम्यान याप्रकरणात घाटकूळ गावात असे आठ प्रकार उघडकीस आल्याचे तहसिलदार यांनी सांगितले आहे.
शेतकरी बांधवांसाठी अतिवृष्टीची मदत हा अतिशय संवेदनशिल विषय.कधी पाऊस जास्त होतो.तर कधी शेतात येउन वाघ शेतात येत शेतकरी बांधवांचे बळी घेत आहेत.यामुळे पिकांची पुरती वाट लागली असतांना दुसरीकडे आता प्रशासनातील काही बोगस लोक शेतक-यांच्या जखमेवर मिठ चोळू लागली आहेत.पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ हे आदर्श गांव.या गावाने गेल्या काही वर्षात राज्यभरात नाव गाजविले.राज्यातील अनेक महान हस्तींनी या गावात भेटी दिल्यात.गावात सुरू असलेल्या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले.पण आता याच गावातून एक खळबळजनक खुलासा काॅग्रेस नेते वैभव पिंपळशेंडे यांनी उघड केला आहे.
सन 2024-25 या वर्षात मोठया प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान झाले.शासनाने अतिवृष्टी जाहीर केली.यानुसार शेतक-यांना मदत मिळणे अपेक्षित होते.पण याठिकाणी काहींनी गेम केला.अनं ज्यांना शेतीच नाही अशा लोकांचे बोगस सातबारे तयार करून अतिवृष्टीची मदत आपल्या खिशात घालण्यात आली.प्राथमिक स्तरावर उघड झालेल्या या कथित घोटाळयात आता असे बारा प्रकार समोर आले असून यातून लाखो रूपये हडपण्यात आले.याप्रकरणाला घेत परिसरातील शेतक-यांत कमालीचा संताप आहे.काॅग्रेसचे युवा नेते वैभव पिंपळशेंडे यांनी पांेभुर्णा येथील पत्रकार भवनात यासंदर्भात पत्रपरिषद घेतली.त्यांनी याबाबतचे पुरावे देत हा बोगस प्रकार उजेडात आणला.बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे जेष्ठ नेते,माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ आहे.सुधीर मुनगंटीवार गेल्या काही वर्षापासून सातत्याने शेतकरी बांधवाचे विविध प्रश्न अतिशय संवेदनरित्या मांडत आहेत.शेतक-यांचे अनेक प्रश्न घेत ते आक्रमकदेखिल झाले आहेत.अशात त्यांच्याच मतदारसंघात हा प्रकार समोर आला आहे.आता याप्रकरणाची सखोल चौकशी करावी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करित आहेत.
ते कोण….
या संपूर्ण प्रकरणात हे असे बोगस काम करणारे,शेतक-यांच्या नावावर आपली पोळी शेकणारे ते कोण कोण आहेत.हा औत्स्युकाचा विषय ठरला आहे.या संपूर्ण भानगडीत एका भाचाचे नाव समोर आले आहे.तो एका मोठया पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समजते.
आठ प्रकार समोर
शेतकरी अनुदान लुटीचा हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनानेही आता चौकशी करण्याचे काम सुरू केले आहे.दरम्यान तहसिलदार मोहनीश शेलवटकर यांनी हा प्रकरणात घाटकुळ येथील असे आठ प्रकार समोर आले आहेत अशी माहिती दिल्याचे वैभव पिंपळशेंडे यांनी सांगितले आहे.
पैसे वसूल करणार….शासनाच्या खात्यात जमा होणार.
घाटकुळ येथील अनुदान लुटीचा हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आता असे प्रकार कुठे कुठे झाले याचा शोध घेउन कार्यवाही करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.दरम्यान ज्यांच्या नावावर पैसे देण्यात आले.आता ते पैसे परत घेतल्या जाणार आहेत.
बडे मासे…..!
पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ येथील गंभीर प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणातील बडे मासे कोण हा प्रश्न विचारला जात आहे.या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी आता संतापलेले शेतकरी करित आहेत.
घाटकुळ येथे शेतकरी अनुदान लुटीचा प्रकार आम्ही समोर आणला.यामुळे अनेक ठिकाणी असा प्रकार होउ शकतो.हा अतिशय गंभीर प्रकार आहे.त्यामुळे प्रशासनाने व सत्ताधा-यांनी याकडे गंभीरतेने बघावे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.
वैभव पिंपळशेंडे,
युवा नेते,काॅग्रेस,पोंभूर्णा


