
चंद्रपूर:-
यंदा कापसाला भाव नाही.आधीच पिकात घट झाली.खर्च जास्त अंन उत्पन्न कमी यामुळे बळीराजाची पंचाईत झाली आहे.अशात आता त्यांची फसवणूक करून लुटण्याचे काम प्रस्थापित व्यावसायीक करीत आहेत.आज चंद्रपूरातील नवेगांव वाघाडे येथील अग्रवाल यांच्या वृंदावन जिनींगमध्ये कापूस विक्रीकरिता आलेल्या शेतक-यांना धर्मकाट्यावर मोजमाप करतांना तब्बल दिड क्विंटल शेतपिक मोजमापात कमी दाखविण्याचा संतापदायक प्रकार समोर आला.दुस-या शेतक-यांनाही हाच अनुभव आला.अनं मग सुरू झाला बळीराजाचा एल्गार.या बोगस प्रकाराची माहिती मिळताच परिसरातील शेकडो शेतकरी एकत्र आले.त्यांनी अहेरी चंद्रपूर या महामार्गावर ठिया मांडला.अनं चक्काजाम करित तासनतास मार्ग रोकून धरला.परिस्थिती नियंत्रणासाठी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले.
काय झाले नेमके……!
आज चंद्रपूर जिल्हयातील पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी येथील निळकंठ गिरसावळे,प्रदीप पिंपळशेंडे या शेतक-यांनी नवेगाव वाघाडे येथील अग्रवाल यांच्या वृंदावन जिनींगमध्ये कापूस आणला. कापूस भरलेल्या वाहनाचे धर्मकाट्यावर मोजमाप करण्यात आले.दरम्यान गिरसावळे यांना मोजमापावरून संशय आला.त्यांना दुस-या ठिकाणावर जाउन मोजमाप केले असता तब्बल एक क्विंटल साठ किलोचा फरक आढळून आला.त्यांच्यासोबत आलेल्या दुस-याही शेतक-याला असाच अनुभव आला.त्यांचे 65 किलो पिकाचे मोजमाप कमी आले.याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देण्यात आली.हा गंभीर प्रकार लक्षात येताच केव्हापासून अनं कधीपासून हा बोगस प्रकार सुरू आहे.याबाबत शंका आल्याने शेकडो शेतकरी एकत्र आले.त्यांनी या बोगस कारभाराबाबत तिव्र संताप व्यक्त केला.नारेबाजी करून या प्रकाराचा निषेध करण्यात आला.विविध राजकीय पक्षाचे नेते घटनास्थळी दाखल झाले.त्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला.दरम्यान ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी या तातडीने सुत्र हालविली.शांतता व सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले.दरम्यान संतापलेल्या शेकडो शेतक-यांनी तब्बल तीन तास अहेरी चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग रोकून धरला.यामुळे वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला.
”या’ केल्या मागण्या……!
आज दोन शेतक-यांनी मोजमापाची पोलखोल केल्यानंतर आजपर्यत अशा किती शेतक-यांची फसवणूक झाली हा मुद्दा समोर आला.यामुळे परिसरातील शेतकरी मोठया प्रमाणावर एकत्र आले.त्यांनी कमालीचा संताप व्यक्त केला सोबतच जिनींगमालकावर गुन्हा दाखल करून अटक करावी.बळीराजाची फसवणूक करणा-यांची जिनींगची परवानगी रदद करावी.सोबत समस्त शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान प्रशासनाने धर्मकाट्याची मोजमाप करण्यासाठी आता चंद्रपूरवरून संबधीत विभागाच्या अधिका-यांना पाचारण केले असून त्याची तपासणी आता सुरू झाली आहे-परिस्थिती लक्षात घेता पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत.
काटा तपास अधिकार्यानी केली जिनिंग मालकाची पोलखोल
आज शेतकरी फसवणुकी प्रकरणी नवेगाव येथे तणाव ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.शेतपिकाच्या मोजमापप्रकरणाला घेत संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले.विविध मागण्यांना घेत त्यांनी एल्गार पुकारला. यानंतर प्रशासनाने धर्मकाटा तपासणीसाठी वैद्यमापक विभागाच्या पाच अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.वैद्यमापक उपविभागाचे अधिकारी तोंडरे,गडचिरोलीचे तपास अधिकारी रुपचंद फुलझेले, निरिक्षक मोरे, मूल विभागाचे गांधारे, वरोरा विभागाचे अधिकारी वाडे यांनी धर्मकाट्याची तपासणी केली. यावेळी १ टना मागे १० किलो शेतपिकाचा फाल्ट त्यांनी काढला.यामुळे सदर जिनिंग चालकांवर आता कोणती कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे



