Sunday, June 28, 2026
spot_img

काॅग्रेसचे ‘‘असे’’…….भाजपचे ‘‘तसे’’ तोडगा निघेनाच……! नेत्यांच्या अट्टाहासाने नगरसेवकही वैतागले

चंद्रपूर:-
नुकत्याच पार पडलेल्या मनपाच्या निवडणुकीत राज्यात काॅग्रेसचे पाणीपत झालय.एक दोन ठिकाणी सोडल तर त्यांना फारशी करामत करता आली नाही.अशात चंद्रपूर मनपात सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणीत काॅग्रेसने जबरान फरफार्म केला.पण कधी मिलीभगत तर कधी नाराजीनाटय..यानंतर ‘‘किडन्यापिंग’’ पाॅलिटिक्स ने काॅग्रेस च्या गोटातील एकनिष्ठ कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.मात्र नेते अदयापही आपल्या अट्टाहासाला दुर करायला तयार नाहीत.या संपूर्ण प्रकारामुळे काॅग्रेसचे नगरसेवकही चांगलेच वैतागले आहेत.वांरवार बैठका करूनही तोडगा निघत नसल्याने आता चंद्रपुरातील सत्ता काॅग्रेसच्या हातून अलगदपणे जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात उमटत आहे.

नेतेही अपयशी…..!

चंद्रपूरात आमदार विजय वडेट्टीवार खासदार प्रतीभा धानोरकर यांचा राजकीय वाद काही नवा नाही.अनेकदा ते आमनेसामने आले आहेत.लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेकांना याचा प्रत्यय आला.दरम्यानच्या काळात आम्ही एकच आहोत.अशा प्रतिक्रीया दोन्ही नेत्यांकडून आल्या होत्या.तेव्हा पक्षात आशादायी वातावरण निर्माण झालं होत.पण आता पुन्हा एकदा यांचा संघर्ष टोकाला पोहचला आहे.काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेतेदेखिल या वादावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत आहेत.यामुळे आता चंद्रपूर मनपात काॅग्रेसच काय होईल.सत्तास्थापनेचे संदर्भ कसे बदलतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

भाजप विजयी पंरपरा राखणार का….?

चंद्रपूर मनपाची स्थापना झाल्यानंतर संगीता अमृतकार यांच्या रूपाने काॅग्रेसला एकदा संधी मिळाली होती.मात्र यानंतर भाजपने सातत्याने मनपावर आपली सत्ता सातत्याने कायम ठेवली.अशात यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार,आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजकीय श्रेयाच्या वादाने भाजपला मोठा फटका बसला.त्यांचे केवळ 23 नगरसेवक निवडून आले.बहुमतापासून त्यांचा हा आकडा बराच दुर आहे.अशात त्यांचे लक्ष हे काॅग्रेसमधील फुटाफुटीच्या वाटचालीकडे आहे.दुसरीकडे उध्दवसेना व वंचित आघाडीशिवाय चंद्रपूरात कुणीच सत्ता स्थापन करू शकत नाही असे चित्र आहे.आपली सत्ता कायम असावी यासाठी भाजपने जोरदार फिल्डींग लावली आहे.पण त्यांना याठिकाण यश मिळणार का हे बघायला लागणार आहे.

यांचे असे …..त्यांचे तसे

चंद्रपूरातील राजकारण अदयापही भल्याभल्यांना समजू शकले नाही.याठिकाणी कधी कोणते राजकीय संदर्भ बदलतील याचा काहीच नेम नाही.एकीकडे काॅग्रेसमध्ये आमदार विजय वडेटटीवार व खासदार प्रतीभा धानोरकर यांचे टोकाचे संघर्ष बघायला मिळत असतांना दुसरीकडेही आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील श्रेयवादाची लढाई आणखिनच तिव्र होतांना दिसत आहे.यामुळे यांचे असे अनं त्यांचे तसे याचीच चर्चा चंद्रपूरातील राजकारणात आहे.

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!