
चंद्रपूर
काॅग्रेसचे विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आज चंद्रपूर जिल्हयातील करंजी या आपल्या जन्मगावी येणार आहेत.त्यांच्यासमवेत त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार देखिल असणार आहेत.साधारणत पाऊनेदोन कोटी रूपयांच्या विकासकामांचे लोकार्पण ते करणार आहेत.दरम्यानच्या काळात शिवानी वडेट्टीवार या गोंडपिपरी तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभ्या राहणार अशा चर्चा रंगल्या होत्या.अशात आता वडिलांसोबत शिवानी वडेट्टीवार देखील गावात येत असल्याने राजकीय वर्तुळात हा दौरा लक्षवेधी ठरला आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण येथेच झाले.त्यांचे वडील नामदेवराव व वडेट्टीवार हे करंजी गावचे सरपंच होते.पण दरम्यानच्या काळात त्यांच्या वडीलांचे निधन झाले.अनं हा परिवार गडचिरोलीत स्थिरावला.
काॅग्रेसचे बडे नेते असतांना देखिल विजय वडेट्टीवार यांनी गावाशी नाळ तुटू दिली नाही.गावातील अनेकांशी त्यांचे व्यक्तीगत संबध आहेत.काही महिन्याआधी त्यांच्या मातोश्री कमलाताई वडेट्टीवार यांचे निधन झाले होते.तेव्हा करंजी येथील अनेक नागरिक नागपुरात त्यंाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचले होते.
आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून साधारणत पाऊने दोन कोटी रूपयाची कामे करण्यात आली.ती कामे पुर्ण झाली असून आज आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.याप्रसंगी माजी आमदार सुभाष धोटे,शिवानी वडेट्टीवार ,जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे माजी अध्यक्ष तथा काॅग्रेस नेते संतोषसिंह रावत,काॅग्रेस नेते कमलेश निमगडे,गावच्या सरपंच सरिता पेटकर,काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक रेचनकर यांची उपस्थिती असणार आहे.समतादूत सचिन फुलझेले व त्यांच्या संच विविध प्रबोधनपर कार्यक्रम सादर करणार आहेत.



