Sunday, October 11, 2026

या ‘‘ पट्ट्याने ’’ कमालच केली.पक्ष बदलविण्याचा दोन दिवसात असा केला रेकार्ड कि,त्याचीच होताहे चर्चा

.चंद्रपूर:-

राजकारणात कोण कधी काय करतील काही नेम नाही.आपल्या स्वहितासाठी गावखेडयातील एका राजकीय पदाधिका-याने असा काही कारनामा केला कि त्याचीच चर्चा आता जोरात रंगू लागली आहे.या राजकीय बहादूर पटटयाने केवळ दोनच दिवसात तब्बल चारदा पक्षप्रवेशाचा रेकार्ड केला आहे.त्यांनी असं का केल हे अदयापही स्पष्ट झाल नसलं तरी त्यांच्या या कारनाम्याबाबतच बोलल जात आहे.सदर रेकार्ड करणारे हे महोदय उपसरपंच आहेत.ते सुब्बई येथील रहिवाशी असून रामलू राठोड असं त्यांच नाव आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.सत्ता मिळविण्यासाठी जे ते नेते कामाला लागले आहेत.आपणच उमेदवार राहू अनं आपलाच विजय होईल या तो-यात ते वावरत आहेत.पण गावखेडयातील सामान्य कार्यकर्ते यात काही मागे नाही.आपले नेते काय करित आहेत.याकडे त्यांच बारीक लक्ष असते.राजुरा विधानसभा मतदारसंघात मोडणा-या सुब्बई येथील उपसरपंच असलेले रामलू राठोड हे तसे काॅग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते.पण त्यांच्यासोबत नेमक काय झाल अनेेकांना माहित नाही.काॅग्रेसच्या या उपसरपंचाने तावातावात शेतकरी संघटेनचे कार्यालय गाठले.अनं थेट संघटनेत प्रवेश केला.त्यांनी संघटनेत प्रवेश केल्याच्या बातम्या माध्यमात काय झळकल्या.काॅग्रेसला धक्काच बसला.हे अस कसं झाल अस म्हणत त्यांनी थेट रामलू राठोड यांचे घर गाठले.कार्यकत्र्याच्या उपस्थितीत पुन्हा एकदा त्यांची काॅग्रेसमध्ये घरवापसी केली.

काल प्रवेश केलेले उपसरपंच पुन्हा काॅग्रेसमध्ये गेल्याचे कळताच संघटनेचे कार्यकर्ते बुचकाळयात पडले.पण त्यांना पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला.कारण रामलू राठोड शेतकरी संघटनेच्या कार्यालयात जात पुन्हा संघटनेत प्रवेश घेतला.राठोड संध्याकाळी घरी परतले.पण यावेळी भाजपचे काही नेते त्यांच्या घरी गेले.राठोंडांना त्यांनी भाजपत प्रवेश दिला.काॅग्रेस,संघटना,परत काॅग्रेस,पुन्हा संघटना अनं शेवटी भाजप असा दोन दिवसात त्यांनी पक्षपव्रेशाचा रेकार्डच केला.त्यांच्या या दोन दिवसाच्या राजकीय वाटचालीची रंगतदार चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात सुरू आहे.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.एक एका कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचे पक्षांपूढे मोठे आव्हान आहे.कार्यकर्ता अशा आणीबाणीच्या स्थितीत नाराज होउ नये याची काळजी पक्ष घेत आहेत.पण आता केवळ दोनच दिवसात अनेक पक्ष बदलविणारे कार्यकर्ते असले तर म्हणावे तरी काय अनं सांगावे तरी कुणाला असा मोठा प्रश्न नेत्यांसमोर निर्माण झाला आहे.रामलू राठोड यांनी असे का केले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.पण या रेकार्डब्रेक प्रवेशाची उपहासात्मक पध्दतीने मात्र जोरात चर्चा सुरू आहे.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!