Sunday, October 11, 2026

गजबेंच ठरलय,होळींच काय..? गडचिरोलीत भाजपमध्ये बंडखोरीचे सावट

गडचिरोली

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आता महायुतीत फटके उडायला सुरवात झाली आहे.अनेकांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचा पावित्रा घेतला आहे.राज्याच्या शेवटच्या टोकावरील असलेल्या गडचिरोलीत काहीशी अशीच परिस्थीती निर्माण झाली आहे.आमदार देवराव होळी हे गडचिरोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.पण त्यांना अजुनही भाजपने उमेदवारी जाहीर केली नाही.एकीकडे आरमोरी मतदारंघात विद्यमान आमदारांना उमेेदवारी जाहीर करण्यात आली मात्र गडचिरोलीबाबत पक्षाने निर्णय राखून ठेवला आहे.यामुळे आमदार होळी यांना
हि धोक्याची घंटी मानल्या जात आहे

मिलींद नरोटे,नामदेव उसेंडी यांनाही उमेदवारी हवी आहे.होळी आपल्या वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत असतात. यावेळी पक्षाने त्यांना वेटिंगवर ठेवले आहेे.यामुळे गडचिरोली मतदारासंघात भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत कार्यकर्त्यांत उत्सुकात शिगेला पोहचली आहे. दरम्यान शक्तीप्रदर्शन करण्यासाठी देवराव होळी उदया गडचिरोलीत मेळावा घेणार आहेत.

गडचिरोली जिल्हयात तिन विधानसभा मतदासंघाचा समावेश आहे.या तिनही जागा अनु.जमातीसाठी राखीव आहेत.महायुतीच्या माध्यमातून अहेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काॅग्रेसच्या अजीत पवार गटाला गेला आहे.यामुळे तिकडे राजे अम्ब्रीशराव आत्राम आता कोणती भूमीका घेतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.भाजपने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.यात आरमोरी विधानसभा मतदारसंघातून आमदार कृष्णा गजबेंना संधी देण्यात आली आहे.पण गडचिरोलीबाबत अदयापही निर्णय घेण्यात आला नाही.गडचिरोलीत भाजपकडून तिन प्रमुख दावेदार आहेत.निर्धार विकासाचा,संकल्प विजयाचा असा नारा देत आमदार देवराव होळी मित्रपरिवाराकडून उदया दि. 25 आक्टोंबर रोजी गडचिरोलीत अभिनव लाॅन येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यामाध्यमातून होळी आपले शक्तीपद्रर्शन करण्याच्या तयारीत आहेत. आमदार होळी यांच्या उमेदवारीला गडचिरोली भाजपातून कमालीचा विरोध होत आहे.अशात गडचिरोली ची जागा भाजपच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहे.आता येथे पक्ष कुणाला संधी देते याबाबत कार्यकर्त्यात उत्सुकता पसरली आहे

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!