Sunday, June 28, 2026
spot_img

‘‘वंचित’’ गोंडपिपरीला शेवटी ‘‘वंचित’’नेच दिला न्याय ,!   महेंद्रसिंह चंदेल यांना उमेदवारी

चंद्रपूर :-

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता पेटली आहे.राजकीय पक्षांची तिकीट मिळविण्यासाठी अनेक नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.पक्ष एक अनं उमेदवार अनेक अशी स्थिती आहे.चंद्रपूरातील राजुरा विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे.अशात गोंडपिपरीला गूड न्यूज मिळाली आहे.वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून सातत्याने ‘वंचित’ असलेल्या गोंडपिपरीला आता हक्काची उमेदवारी मिळाली आहे.महेंद्रसिंह चंदेल यांना राजुरा विधानसभा मतदारसंघातून वचिंत ने उमेदवारी दिली आहे.पहिल्यांदाच गोंडपिपरीच्या वाटयाला हि सुवर्णसंधी आली असून अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

राजुरा विधानसभेची स्थापना झाल्यापासून जिवती,गोंडपिपरी या तालुक्याला न्याय मिळाला नाही.येथील नेत्यांना नेतृत्वाची संधी मिळाली नाही.राजु-यातील प्रस्थापित नेत्यांनी केवळ मतांचे राजकारण केले.पण आता गोंडपिपरी तालुक्याला वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून नेतृत्वाची नवी संधी मिळाली आहे.स्थानिक उमेदवार हवा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यात होती.आता ती पूर्ण झाली आहे.

कोण आहेत चंदेल………!

महेंद्रसिंह चंदेल हे गोंडपिपरी येथील नेते आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष्यपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.मागील काळात त्यांनी बहूजन समाज पार्टीच्या माध्यमातून राजकीय भूमीका बजावली.महेंद्रसिंह चंदेल हे गोंडपिपरी नगरपंचायतीचे नगरसेवक आहेत.त्यांच्या पत्नी सविता चंदेल या देखिल नगरसेवक आहेत.चंदेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत.त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे.सरदार पटेल महाविद्यालातून त्यांनी सिआर ची निवडणूक लढविली अनं जिकंली.यांनतर त्यांच्या राजकीय वाटचालीला सुरवात झाली. त्यांचे जेष्ट बंधू राजीवसिंह चंदेल हे काॅग्रेसचे नेते आहेत.अनेक दशक त्यांनी गोंडपिपरी काॅग्रेसची जबाबदारी सांभाळली.

वंचित ने दिला न्याय………..!
राजुरा विधानसभा मतदारसंघात आजपर्यत राजु-याच्याच वाटयाला नेतृत्वाची संधी मिळाली.गोंडपिपरीच्या वाट्याला  पहिल्यांदा महेंद्रसिह चंदेल यांच्या माध्यमातून वचिंत ने न्याय दिला आहे.तालुक्यात स्थानिक उमेदवार हवा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती.ती आता वंचित बहूजन आघाडीने पूर्ण केली आहे.

                                       युवकांना प्रोत्साहन….!
राजुरा विधानसभा मतदारसंघातील जिवती,गोंडपिपरी तालुक्यातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रेरणा मिळावी यासाठी महेंद्रसिंह चंदेल यांनी गेल्या वर्षभरॅप्सून मोठे काम केले.राजुरा,गोंडपिपरी,जिवती या तालुक्यातील गावागावात त्यांनी स्पर्धाचे आयोजन केले.

  राजुऱ्यातील राजकीय समीकरण बदलणार—-!
राजुरा मतदारसंघात राजुरा,जिवती,कोरपना,गोंडपिपरी या चार तालुक्याचा समावेश आहे गोंडपिपरी तालुका नेहमी या विधानसभा मतदारसंघाचा शिलेदार ठरवीत आला आहे. मागील निवडणुकीतही याचाच प्रत्यय अनुभवायला मिळाला.२०१९ च्या निवडणुकीत गोंडपिपरी तालुक्याची मतपेटी उघडली अन सुभाष धोटे आमदार झाले.अतिशय अटीतटीच्या लढतीत त्यांनी वामनराव चटप यांचा पराभव केला होता.महेंद्रसिंह चंदेल यांना उमेदवारी जाहीर होताच गोंडपिपरी सह जिवती तालुक्यात वंचित समर्थकात आनंदाचे वातावरण आहे. गोंडपिपरीत स्थानिक उमेदवार हवा असे वातावरण सुरु आहे.अशात चंदेल यांना उमेदवारी मिळाल्याने या मतदार संघातील समीकरणज बदलू शकते असा सूर राजकीय वर्तुळात उमटत आहे.

              

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!