
गडचिरोली:-
कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता गेल्यानंतर काॅग्रेस नेते अजय कंकडालवार यांना पुन्हा एक राजकीय धक्का बसला आहे.त्यांच्या नेतृत्वात अहेरी नगरपंचायतीच्या सत्तेत असलेल्या नगराध्यक्षासह आठ नगरसेवकांना अपात्र करण्यात आले आहे.गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी हा निर्णय दिला आहे.या राजकीय घडामोडीनंतर आता याचीच चर्चा रंगू लागली आहे.एक एक सत्ताकेंद्र हातून जात असल्याने काॅग्रेस च्या गोटात अस्वस्थता आहे.
अहेरी येथील नगरपंचायतीवर अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यात आली.अनेक पक्षातील नगरसेवकांची जोड करून नगरपंचायतीवर त्यांनी झेंडा रोवला.दरम्यान अहेरी येथील प्रभाग क्रं 10 येथे काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांची दोन घरे आहेत.मधात शासकिय रस्ता आहे.अशावेळी त्यांनी याठिकाणी उडडानपूल बांधले.नगरपंचायतीत त्यांचीच सत्ता असल्याने सहजरित्या ठराव मिळाला.हा संपुर्ण प्रकार बेकायदेशीर असल्याचे सांगत याप्रकरणाची तक्रार भाजपच्या नगरपंचायतीच्या गटनेत्या शालीनी पोहणेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली होती.याप्रकरणी प्रकरणाची कार्यवाही सुरू झाली.अनं शेवटी याप्रकरणात गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी निकाल देत अहेरीच्या नगराध्यक्षासह आठही नगरसेवकांना दोषी ठरवित त्यांचे पद अपात्र केले आहे.हा निकाल येताच अहेरीच्या राजकीय वर्तुळात आता याचीच चर्चा सुरू झाली आहे.
अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीत अजय कंकडालवार यांची सत्ता होती.माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात याठिकाणी सत्तापलट करण्यात आला.यानंतर विधानसभा निवडणुकीत अनेक प्रयत्न करूनही हनुमंतू मडावी यांना उमेदवारी मिळाली नाही.त्यांनी उमेदवारी दाखल केली पण त्यांचा पराभव झाला.मडावीच्या उमेदवारीसाठी काॅग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी जोरदार लांबीग लावली होती.यानंतर आता कंकडालवार यांच्या गटाला विरोधकांनी जोरदार धक्का दिला आहे.नगराध्यक्षासह आठही नगरसेवकांना अपात्र करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू झाली असून आता याठिकाणी सत्ताबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
चाहुल लागली पण…….!
बेकायदेशिर ठराव प्रकरणात आपणावर कार्यवाही होउ शकते याची चाहूल लागताच काही नगरसेवकांनी पक्षांतर केल.राज्यात सत्ता असणा-यांच्या पाठीशी राहिल तर आपला बचाव होईल अशी त्यांची भूमिका होती.पण हा त्यांच्या पक्षांतराचा डाव सुध्दा आता निष्फळ ठरला असून हि सारी मंडळी आता अपात्र झाली आहे.
असाही योगायोग
गेल्या अडीच वर्षापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते.नगराध्यक्षाचा कालावधी हा अडीच वर्षाचा असतो.पण शासनाने नुकताच एक निर्णय देत तो पाच वर्षाचा करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे अडीच वर्ष झाले पुन्हा तारीख पे तारीख मिळेल व आपण पाच वर्ष पूर्ण करू असा आशावाद सत्ताधारी गटाला हेाता.पण जिल्हाधिकारी संजय दैने यांनी निकाल देत त्यांना अपात्र केले.विशेष म्हणजे कालच जिल्हाधिकारी दैने यांची बदली झाली आहे.त्यांच्या जागी आता अभिशांत पांडा हे नवे जिल्हाधिकारी असतील


