Monday, October 12, 2026

मुनगंटीवारांनी ‘‘या’’ शब्दात लगावला जोरगेवारांना टोला….!

चंद्रपूर:-

ब्रिजभुषण पाझारे यांच्या उमेदवारीसाठी सुधीर मुनगंटीवार आग्रही होते.पण जोरगेवारांनी भाजपत प्रवेश घेतला.निवडणूक लढविली अनं विजय मिळविला.दुसरीकडे मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही.पाझारेंच्या बंडखोरीमागे मुनगंटीवारांचा हात असल्याचा संशय जोरगेवार समर्थकांना आहे.यातूनच आता चंद्रपूरच्या भाजपच्या वर्तुळात व्दंद सुरू आहे.कर्मवीर मा.सा.कन्नमवार यांच्या शतकोत्तर जयंतीमहोत्सवाच्या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांना दुय्यम स्थान देण्यात आले.त्यामुळे या कार्यक्रमाकडे त्यांनी पुरती पाठ फिरविली.

विजय वडेट्टीवार हे अध्यक्षस्थानी होते.एक मंत्रीपद अजूनही रिकामे आहे.हा वारांचा जिल्हा असून तुम्ही भाजपात यावे.मंत्रीपद मिळणार असे सांगत त्यांनी वडेटटीवार यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर खुली ऑफर दिली होती.दरम्यान आता सुधीर मुनगंटीवार यांनी या मुदयाला घेत जोरगेवारांना चांगलाच टोला लगावला आहे.मंत्रीपद कुणाला दयायच याचे अधिकार पक्षश्रेष्ठीकडे असतात.पक्षाच्या संविधानात काही बदल झाला असेल तर त्याची माहिती आपणास नाही.कुणी खतपाणी घातले म्हणून झाडे मोठ होत नाही.असे सांगत त्यांनी नाव न घेता जोरगेवारांची चांगलीच फिरकी घेतली.

सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या अनेक समर्थकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.शपथविधीच्या आधी मंत्रीपदाच्या यादीत तुमचे नांव आहे.अस सांगण्यात आल होत.पण ऐनवेळी आपल नाव का कापल असा सवाल करित मुनगंटीवारानी नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर त्यांनी शपथविधाला जाणे टाळले होते.चंद्रपूरात नुकत्याच पार पडलेल्या कर्मवीर मा.सा.कन्नमावार यांच्या जंयतीमहोत्सवालाही ते उपस्थित नव्हते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार किशोर जोरगेवार होते.दरम्यान त्यांनी आपल्या भाषणातून वडेट्टीवारांना दिलेल्या ऑफरनंतर आता सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवारांची चांगलीच फिरकी घेतली आहे.

एखादयाला असही फसवायच का…..!

भारतीय जनता पक्षात पक्षश्रेष्ठी महत्वाचे आहेत.मंत्रीपद कुणाला दयायच हा निर्णय तेच घेतात.पक्षीय कार्यपध्दती याच पध्दतीने चालते.असे असतांना एखादयाला मंत्रीपदाची ऑफर देत त्यांची गंमत करून फसवणूक करायची असा जर हा कार्यक्रम असेल तर मला याबाबतीची माहिती नाही असे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवारांची चांगलीच फिरकी घेतली.

 

 

़.

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!