Sunday, October 11, 2026

“तेरे” मासूम सवालोसे “परेशान” हू मै सुधीर मुनगंटीवार यांच्या अनेक वक्तव्याने अनेकजण “परेशान”

चंद्रपूर:-

भाजपचे जेष्ठ नेते,राज्याचे माजी वने,सांस्कृतिक मत्स्यव्यवसाय मंत्री यांचे आजचे विधीमंडळातील भाषण अनेक अर्थानी अनेकांना ‘परेशान’ करणारे ठरले.”तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हू मै….!” “तेरे मासूम सवालोसे परेशान हू मै…..!” असे आपले नेते नितीन गडकरी नेहमी म्हणतात.मी काही बोललो कि,मला मंत्री केल नाही म्हणून नाराज असतील असा प्रश्न उपस्थित केल्या जातो.पत्रकार प्रश्न विचारतात पण मी त्यांना हेच सांगतो कि “तेरे सवालोसे परेशान हू मै”आपण सभागृहात पदावर जाण्यासाठी आलेलो नाहीत.निवडणूका जिंकणे आपले लक्ष्य नाही.तर मतदारसंघातील दीन,दुर्बल,शोषित,पिडीत,वंचितांची मने जिंकण्यासाठी आम्ही सभागृहात आलो आहोत.असे ते म्हणाले,शेतकरी बांधवांची कर्जमाफी होउ शकते त्यासाठी सकारात्मकता ठेवावी लागेल असे सांगत त्यांनी आपल्याच महायुती सरकारच्या अनेक चुका काढल्या.

 चमकोगिरीवर टिकास्त्र
अनेक बडे अधिकारी मंत्रीमहोदयांच्या चमकोगिरी करण्यात व्यस्त आहेत.राज्याच उत्पन्न वाढू शकत.कर महसूल कमी झाला आहे.याकडे आपणास लक्ष दयावे लागेल.काही अधिकारी काम कमी अनं चमकोगिरी जास्त करतात.अशा अधिका-यांना मोठी पद देउ नयेत.मंत्री आले कि हाजी हाजी करतात.पण काही चांगलेही अधिकारी आहेत.आपणास उत्तम अधिकारी मिळाले पाहिजेत.
कर्जमाफी हवी….!
आपल्या आजच्या भाषणात सुधीर मुनगंटीवार यांनी तुफान फटकेबाजी केली.भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून आपणास कोणताही फायदा नाही.पण आता तुम्ही डेअरिंग करा,काय घाबरता कर्जमुक्ती करण्यासाठी.कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे.यासाठी केवळ 20 हजार कोटी रूपये लागतील.आत्मा बेशुध्द झाला आहे.त्याकडे लक्ष दयायची गरज आहे.मी अनेक मागण्या केल्या पण त्याच्यातील एकही मुददा घेतला नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
     

दरवाजे आमचेच
अयोध्या रामजन्मभूमीसाठी,संसद भवनासाठी व पंतप्रधान कार्यालयासाठी आम्ही चंद्रपूरातील लाकूड दिले.मी तर या ठिकाणी पोचू शकलो नाही.पण याठिकाणचे प्रत्येक दरवाजे आम्ही दिले आहेत.पण आम्ही 75 कोटी विकासकामासांठी मागितले.पण अधिका-यांनी आम्हाला निधी दिला नाही.गडचिरोलीला 500 कोटी रूपये देता मग चंद्रपूरवर हा अन्याय का असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.ताडोबा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष होत आहे.असे मुनगंटीवार म्हणाले.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!