
चंद्रपूर:-
महाराष्ट्राला मोठा पुरोगामी वारसा लाभला आहे.अनेक महापुरूषांनी आपल्या सामाजिक कार्यातून समाज घडविण्याचे काम केले.महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रि शिक्षणाचा पाया रोवला.राज्याचे माजी सांस्कृतिक,वने व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.त्यांच्या मागणीनंतर राज्यातल्या शंभर आमदारांनी समर्थन दिले आहे.दरम्यान सुधीर मुनगंटीवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मागणी करणार आहेत.
पूणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी अथक परिश्रम घेतले होते.आता त्यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याची मागणी रेटून धरली आहे.त्यांच्या या मागणीला राज्यातील शंभर आमदारांनी पांठिबा दिला असून आपल्या स्वाक्ष-याही दिल्या आहेत.दरम्यान या मुदयाला घेत सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत फुले दाम्पत्यांना भारतरत्न या सवौच्च पुरस्कार देण्यासदंर्भात ठराव मांडला.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्च केले.अतिशय खरतळ परिस्थितीत त्यांनी समाजाला दिशा दिली.सावित्रीबाई फुले यांनी स्त्रि शिक्षणाचा पाया रोवला.त्यांच्या महान कार्याला सलाम करण्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशातील सर्वोच्च पुरस्कार बहाल करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
दरम्यान हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा व सौभाग्याचा क्षण असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.दरम्यान क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्र्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी विधानसभेत ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविणार असल्याची घोषणा राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केली.
हा अभिमानाचा क्षण
महात्मा फुले अन सावित्रीबाई फुले यांनी आपले जीवन समाजासाठी खर्ची घातले. त्यांचे योगदान देश विसरणार नाही. महात्मा फुले अन सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कार देण्यासंदर्भात महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेत मांडताना हा क्षण अभिमानाचा आणि सौभाग्याचा ठरला आहे अशी प्रतीक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली



