Saturday, October 10, 2026

“त्यांच्या” “या” वेदनांना अंतच नाही सुधीर मुनगंटीवार यांची तत्पर संवेदनशीलता, मुख्यमंत्र्यांनी लगेच जाहीर केली मदत

चंद्रपूर

राज्याचे माजी वने,सांस्कृतिक मत्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार अनं “संवेदना” यांच एक वेगळच नात आहे.गेल्या अनेक दशकांपासून राजकारण करतांना त्यांनी सातत्याने सामाजिक कणव जोपासली.अडत्यांना मदतीचा हात देण्यास ते कधीच मागे हटले नाहीत.त्यांच्या याच स्वभावगुणाने राज्यातील त्यांच्या राजकारणाच्या पध्दतीला वेगळीच धार आहे.परवा एका दुर्देवी घटनेत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेणा-या तिन तरूणांचा वैनगंगा नदीपात्रात बूडून मृत्यू झाला होता.या घटनेेने समाजमन अस्वस्थ झालं.त्यांच्या कुटुुबियांकरिता तर हा मोठाच धक्का ठरला.त्यांच्या या वेदना आयुष्यभर सल देणा-या ठरणार आहेत.या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला.त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून मागणी केली.काही तासातच मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची मागणी मान्य केली आता या तिनही कुटुंबियांना प्रत्येकी पाच लक्ष रूपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येणार आहे.

गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे तिन विद्यार्थी गोपाल गणेश साखरे (बुलढाणा), पार्थ बाळासाहेब जाधव (अहिल्यानगर, शिर्डी) आणि स्वप्निल उद्धवसिंह शिरे (छत्रपती संभाजीनगर) हे तिघे विद्यार्थी १० मे रोजी वैनगंगा नदीत पोहण्यासाठी गेले असता, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय शिक्षणाच्या प्रारंभीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मदतीची मागणी केली होती. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी काही तासातच प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.

“या दुर्घटनेमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. समाजसेवेचे स्वप्न बाळगून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केलेल्या या तरुणांचे आयुष्य अचानक संपुष्टात आले. त्यांच्या कुटुंबांना शासनाकडून दिलासा मिळावा, हीच भावना माझी होती. यासाठी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्वरित मान्यता दिली, याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे,” अशी भावना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

आयुधांचा वाफर
मंत्रिपद न मिळाल्याने सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याच्या चर्चा दरम्यानच्या काळात होत्या. पण मंत्रिपदाशिवायही आपण समाजातील दुर्बल,पीडित,उपेक्षित व अन्यायग्रस्थाना मदतीचा हात देऊ शकतो.यासाठी आपल्याकडे असलेल्या आयुधांचा आपण वाफर करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी ठासून सांगितले होते.आता  याच आयुधांचा ते मोठ्या वाफर प्रमाणावर करीत आहेत.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!