
गडचिरोली:-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालक असलेल्या गडचिरोली जिल्हयात समस्याच समस्या आहेत.पावसाळयाच्या दिवसात यात अधिकची भर पडणार आहे.पण याकडे ना फडणवीसांचे लक्ष आहे.नाही येथील प्रशासनाचे.यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.एकीकडे समस्या सोडवायच्या नाहीत दुसरीकडे 162 कोटी रूपयांच्या विकासकामांच्या निधीला ब्रेक लावायचा हा प्रकार संतापजनक आहे.काॅग्रेसकडून वांरवार निवेदन देण्यात आलीत.आंदोलन केल्या गेली पण कुंभकर्णी सत्ताधारी व प्रशासनाने याची दखल घेतली नाही.त्यामुळे आता काॅग्रेसच्या वतीने वर्षभर आंदोलनाची मालिका राबविण्यात येणार आहे.या मोहिमेची सुरवात जिल्हाधिकारी कार्यालयात “ढोल वाजवू” या आंदोलनाव्दारे करण्यात येणार आहे.दरम्यान गडचिरोलीच्या विकासाबाबत अशीच असंवेदनशिलता जर दाखवित असाल तर खबरदार वेळप्रसंगी आम्ही कायदा हातात घेण्यातही मागेपुढे बघणार नसल्याचा इशारा गडचिरोली जिल्हा काॅग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला आहे.काल दि. ५ जुलै रोजी गडचिरोलीतील सर्किट हाउस येथे पत्रकांराशी बोलतांना त्यांनी हि माहिती दिली.
सुरजागड लोहप्रकल्प आणण्यानंतर सत्ताधा-यांनी त्याचे खूप मार्केटींग केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हेलीकाॅप्टर वरून येत आता राज्याची खरी सुरवात गडचिरोलीपासून होईल असे सांगितले होते.मात्र प्रत्यक्षात गडचिरोली जिल्हयात सामान्यांना प्राथमिक गरजा पूर्ण करण्याकरिता टोकाचा संघर्ष करावा लागत आहे.मुख्यमंत्री सांगूनही येथील शेतक-यांना विज पुरवठा देण्यात येत नाही.डिमांड भरून वर्षानुवर्ष वाट बघणारे शेतकरी आता कमालीचे संतापलेले आहेत.यावरून मुख्यमंत्रीमहोदयांचे आदेशही प्रशासनातील अधिकारी मानायला तयार नाही हे स्पष्ट होते असे ब्राम्हणवाडे म्हणाले.
जिल्हाच्या विकासासाठी 135 कोटी रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता.पण गेल्या सहा महिन्यांपासून या निधीला ब्रेक लावण्यात आला आहे.या निधीतून बरीच विकासाची कामे झाली असती.पण हि त्यांना होऊ दयायची नाहीत.शेतक-यांना बोनस देण्यात येत नाही,गरीबांना उपचार घेण्यासाठी पाण्यातून जिव मुठीत घालीत प्रवास करावा लागत आहे.हा सारा गंभीर प्रकार आहे.यामुळे आता आरपारची लढाई आपण करणार आहोत.येत्या वर्षभरात टप्प्याटप्याने आंदोलनाची मालीका चालविणार आहोत.याची सुरवात जिल्हाधिकारी कार्यालयात ढोल वाजवून करणार असल्याची माहिती काॅग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
”दस्तुरखुद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असतांना 162 कोटी रूपयाच्या निधीला सहा महिन्यापासून ब्रेक लागत असेल तर काय म्हणावे.येथील प्रशासन मुख्यमंत्रीमहोदयांचे आदेश मानत नाही हे दुर्देवच म्हणावे लागेल.”
महेंद्र ब्राम्हणवाडे,जिल्हाध्यक्ष,काॅग्रेस,गडचिरोली.



