व्यावसायीक कुटुंबातील तरूण विशेषत: राजकारणात येत नाहीत.पण एक उमदा तरूण व्यावसायीक कुटुंबातून पुढे येतोे.सामाजिक कणवेची जाणीव ठेवीत राजकारणात उडी घेतो.अनं त्यामाध्यमातून समाजातील अडलेल्यांना,वंचितांना,सामान्यांना मदतीचा हात देतो.समाजातील शेवटच्या घटकांनाही तो आपल्या कर्तृत्वाने आपलेसे करतो.वयोवृध्द आजीला आधार म्हणून काठी देतो.ग्रामीण भागातील तरूणाईने स्पर्धा परिक्षेत यश मिळवावे म्हणून त्यांना पुस्तक देतो.रुग्णांना आधार देतांना अतिशय संयमाने कुठलाही गाजावाजा न करता अनेकांना गुपचूपपणे मदत करतो.अनं सामान्यांचा चाहता बनतो.राजकारण करतांना सामाजिक जाणीव कशी जोपासता येउ शकते याच उत्तम उदाहरण म्हणजे गोंडपिपरीच्या नगरपंचायतीचे गटनेते,भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष चेतनसिंह गौर आहेत.आज त्यांचा वाढदिवस आहे.त्यांना यानिमीत्ताने अनेकानेक शुभेच्छा…!
चेतनसिंह गौर यांची राजकीय सुरवात महाविद्यालयीन जिवनापासून सुरू झाली.आपल्या या पहिल्याच इनिंगमध्ये त्यांनी मातब्बर विरोधकांना धुळ चारली.अटीतटीच्या लढतीत बाजी मारीत आपल्या मित्राला नेतृत्वाची संधी दिली.अन येथूनच ख-या अर्थाने त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले.क्रिकेटवर प्रेम करणा-या या क्रिडापटटूने आपल्या जिवनाला कलाटणी दिली.अनं येथून सुरू झालेला प्रवास आज एक संवेदनशिल व्यक्तीमत्वाच्या रूपाने सर्वांसमोर आहे.ग्रामपंचायत सदस्य ते नगरपंचायतीचे उपाध्यक्ष,पक्षाचा गटनेता अनं आता गोंडपिपरी सारख्या शहराचा भाजप पक्षाचा प्रमुख हा त्यांचा प्रवास उल्लेखनियच राहिला आहे.
खर तर राजकारण हे समाजकारणाच अतिशय मोठ माध्यम आहे.पण अलीकडच्या राजकारणात हि बाब दुर्मीळच झालीय.अशात समाजात चेतनसिंह गौर यांच्यासारखी व्यक्तीमत्व नवी उमेद देणारी ठरतात.राजकारण करणा-यांत मोठी आक्रमकता असते.ते कुणाचही मानत नाही,कुणाला जुमानत नाही.असा खरा समज आहे.पण चेतनसिंह गौर यांच्यात असणारा कमालीचा संयम त्यांना खास बनवून जाते.गोंडपिपरीतील प्रभाग क्रमांक 13 चे नेतृत्व करतांना त्यांनी त्या भागातील अतिशय सामान्य नागरिकांना वेळोवेळी मदत केली.कोरोनाच्या संकटकाळात त्यांचा ते आधारच बनले.
गोंडपिपरी तालुक्यातील तरूणाईंसाठी खोब्रागडे बंधू यांनी सुरू केलेल्या दिपस्तंभ अभ्यासिकेला त्यांनी वारंवार मदत केली.स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या ग्रामीण भागातील मुलामुलींना हवे ते पुस्तक उपलब्ध करून दिलीत.
चेतनसिंह गौर हे गोंडपिपरी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष होते.त्याकाळात भाजपचे जेष्ठ नेते सुधीरभाउ मुनगंटीवार हे राज्याचे अर्थमंत्री होते.चेतनसिंह गौर यांनी वारंवार पाठपुरावा करून गोंडपिपरी शहराच्या विकासाकरिता विस कोटी रूपयाचा निधी मंजूर करून घेतला.यातून पिण्याच्या पाण्याची व अंतर्गत रस्त्याची कामे संपन्न झालीत.
गोंडपिपरी तालुका हा काॅग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा.पण यावेळी पार पडलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी ऐतिहासिक विजय मिळवीत बाजी मारली.अर्थात गोंडपिपरी तालुक्याचे त्यांच्या विजयात मोठे योगदान राहिले.पक्षाच्या समस्त कार्यकर्त्यांच्या
सामुहिक मेहनतीचे हे फळ होते.गोंडपिपरी तालुक्याने भाजपला कौल दिला.पहिल्यांदाच गोंडपिंपरी नगरात भाजपला बहूमत मिळाले.गोंडपिपरी नगरातील भाजपचे शहराध्यक्ष म्हणून चेतनसिंह गौर यांनी केलेल्या या कामगिरीची दखल पक्षानेही घेतली.अतिशय संयमी,शांत व राजकारण करतांना समाजकारणाला प्राधान्य देणारा युवा नेते चेतनसिंह गौर यांचा आज वाढदिवस आहे.त्यांचा समाजाकरिता लढणा-या या वृत्तीचा आलेख असाच वाढत रहावा या सदिच्छेसह त्यांना अनेकानेक शुभेच्छा..!

{लेखक :- दिपक सातपूते हे भारतीय जनता पार्टी,तालुका गोंडपिपरीचे तालुकाध्यक्ष आहेत.}
.


