
चंद्रपूर:-
शेती बळीराजासाठी जिव कि प्राण.आपल्या थोडयाफार जमीनीच्या तुकडयावर कमालीची मेहनत घ्यायची.रातदिवस एक करायच.अनं उदयाच्या आशेची स्वप्न बघायची.एकीकडे पाउस थांबायच नाव घेत नाही.दुसरीकडे प्रंचड नुकसान झाली असतांना अतिवृष्टीमधून वगळल जातं.अशा एक ना अनेक समस्या आवासून समोर असतांना आता हे वन्यजीव माणसाच्या जिवावर उठलेत.शेतात काम करायला मजूर मिळत नाही.अनेकांना विनवणी करून थकलेली महिला शेतकरी एकटीच कामाला शेतात जाते.अनं वाघाच्या हल्ल्याची बळी ठरते.आधी चेकपिपरीतील भाउजी पाल अंन आता गणेशपिपरीत अल्का पंेंदोर.गेल्या आठ दिवसात दोन बळीराजाचे जिव गेलेत.पण प्रशासन काही एक करायला तयार नाही.त्यांचे प्रयत्न का अपयशी ठरताहेत हा देखिल प्रश्नच आहे.सत्ताधारी,विरोधक तर निवडणूकीसाठी उमदेवार शोधायला निघालेत.अशा वेळी या गरीब शेतकरी बांधवांचा कुणी वाली नाही का असा संतप्त सवाल आता विचारला जातोय.
मानव वन्यजीव संघर्ष हा चंद्रपूरचा नवीन विषय नाही.पण सातत्याने होत असलेल्या या प्रकाराने गरीब शेतकरी बांधवांचे,कष्टक-यांचे,शेतमजुरांचे नाहक बळी जाताहेत त्याचं कायं.चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुक्यात दहा वर्षापूर्वी वेजगाव येथे बिबट व वाघाने कहर केला होता.अनेकांचे बळी घेतले होते.महिनाभर हा विषय आक्रमक झाला होता.आता गणेशपिपरी,चेकपिपरीच्या रूपाने पुन्हा त्या घटनाक्रमांची आठपण झालीय.कन्हाळगांव या अभयारण्याअंतर्गत येणा-या या संपूर्ण जंगलात वाघांची लक्षणीय संख्या आहे.पण वेजगावचा प्रकार सोडला तर येथील वाघांनी नागरिकांना कधीच त्रास दिला नाही.मग आता नागरिकंाचे जिव घेणारा नरभक्षी टी-115 नेमका बाहेरून आणून सोडला कि कस काय हे कुणी सांगायला तयार नाही.
अल्का पेंदोरअल्पभुधारक शेतकरी महिला.आपल्या मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी आपला पुर्णवेळ शेतासाठी देण्याचे ठरविले.अनं अशातच त्यांचा आज जिव गेला.आपल्या आईचा अशा पध्दतीने अंत झाल्याचे बघून मुलांचा आक्रोश अनेकांना रडविणारा ठरला.शासनाच्या नियमानुसार मृतकाच्या कुटुंबियांना पैसे मिळवितीलच पण मुलांनी कायमसाठी आपल्या आईला गमविल हे शल्य त्यांना आयुष्यभर टोचत राहील.एकदा वाघाला माणसाची चटक लागली कि तो पुन्हा शक्यतो दुसरी शिकार करित नाही.अशावेळी आता दोन बळी घेतलेल्या वाघाला तातडीने जेरबंद करून कुठतरी दूरवर सोडण्यासाठी वनविभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.आपल्या गावातील एका गरीब शेतकरी महिलेचा असा अंत बघून संतापलेल्या गावक-यांनी आक्रमक भुमीका घेतली.आता पुन्हा किती बळी घेण्याची वाट सत्ताधारी,प्रशासन बघताहेत असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.



