Sunday, June 28, 2026
spot_img

ओळख उमेदवाराची………………. जनसामान्यांचे ‘‘वैभव’’

गावखेडयातील एक तरूण आपल्या उज्वल भविष्याची स्वप्ने घेत चंद्रपूर,नागपूर,पूणे अशा प्रवासाचा टप्पा गाठतो.एमबीए करतो,इंजिनीअर होतो.अनं लगेच कार्पोरेट कंपनीत मोठया पदावर जातो.गलेलठ्ठ पगार.सर्व काही आलबेल.पण तो वेगळा विचार करतो.समाजातील शोषित,वंचित,पिढीत,दुर्लक्षित घटकांसाठी आपण पुढे येणार नाही तर कोण येणार असा विचार करतो.लाखो रूपयाच्या पॅकेजला बाजुला करून गावात येतो.रंजल्या,गांजल्यांच्या मदतीला धावून जातो.गरीबांना घरकूल मिळालेच पाहिजे यासाठी आवाज उठवितो.स्थानिक आमदार अर्थमंत्री असतांना त्यांच्या जनविरोधी भुमिकेचा प्रखर विरोध करून पेटून उठतो.परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्याना वाचनालयाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात स्वत धाव घेत लोकांना मदतीचा हात देतो.अलीकडे कुणी कुणायला मदत करण्यासाठी तयार नसतांना,चौफेर कमालीची असंवेदनशिलता पसरली असतांना लोकांच्या सुखदुखाचा तो भागीदार होतो.सत्ताधारी,प्रशासनाविरोधात एल्गार उभारून जनसामान्यांचे प्रश्न हिरारीने मांडतो.अतिशय संवेदनशिल असं या व्यक्तीमत्वाच नांव आहे वैभव कुशाबराव पिंपळशेंडे.
पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथील या उमदया तरूणाच्या कार्याचीच सध्या जोरदार चर्चा आहे.

 

वैभव हे चेकठाणेवासना (कवठी) या छोट्याश्या गावाचा रहिवाशीत्यांचे वडील जि.प.शिक्षक त्यामुळे घरात शैक्षणिक वातावरण होतं.मुलगा शिकला पाहिजे,अधिकारी झाला पाहिजे.एवढीच त्यांची माफक अपेक्षा.वैभव यांच्या शैक्षणिक पाढ्याची सुरुवातच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण घेता घेता झाली.चेक ठाणेवासना पासून सुरू झालेला शिक्षणाचा प्रवास वेळवा, गोंडपिपरी,चंद्रपूर,नागपूर,पुणे असा झाला.
इंजिनिअरींग चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच त्यांनी (एम.बी.ए.)चं ही शिक्षण पुर्ण केलं.आणि लागलीच एका साॅफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीला गवसणी घातली.तीन वर्ष कार्पोरेट कंपनीत काम केल्यानंतर कोरोना काळात तो आपल्या गावी चक ठाणेवासना ला आला.या कठीण प्रसंगी लोकांची होत असलेली फरफट,लोकांची आरोग्याशी होत असलेली लढाई पाहून वैभवच मन व्यथित झालं.अनं तेव्हापासून त्यांच्या आयुष्याने कलाटणी घेतली

आपला गाव,आपला परिसरात समस्या एवढया आहेत हि त्या सोडविण्यासाठी कुणीच समोर येत नाही याची त्यांना जाणीव झाली. अन यातूनच सुरु झाला त्यांच्या समाजसेवेचा अध्याय.जनसामान्य हा एकमेव केंद्रबिंदू ठेवून त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला. ,शेकऱ्यांची समस्या,शेतमजूरांची प्रश्न,निराधार व अपंग लोकांचे होत असलेलं हाल,गावातील रस्ते, पाण्याच्या सुविधा, विद्युत समस्या,खतांची समस्या अश्या अनेक समस्यांवर त्यांच काम सुरू झालं.त्यांची काम करण्याची पद्धतच युनिक.ते थेट समस्याग्रस्त व्यक्ती व समस्याला घेऊन प्रशासनाकडे ठान मांडून बसायचा.जो पर्यंत त्यावर तोडगा निघत नाही तो पर्यंत मागे हटायचा नाही. सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न सुटत नव्हते,तेव्हा तेव्हा वैभव यांनी कठोर भूमिका घेतली.आंदोलन केलीत.मोर्चे काढलेत.प्रशासनाला धारेवर धरून जाब विचारला. कुणी अपघातात पडला आहे,कुणी आजारी आहे,कुणाला आरोग्याची समस्या आहे,वैभवला यांना हे दिसलं कि,ते धावून जातात. कित्येक गंहीर जखमींना त्यांनी स्वतःच्याच कारने दवाखान्यात भरती करून त्यांचे प्राण वाचविलेत.कित्येक मृतदेह दवाखान्यातून घरी नेण्यासाठी स्वताच आपल्या कारने मृतदेह घरी नेऊन देण्याचे काम केले.

वैभव सुशिक्षित असल्याने ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभं राहण्याचा आग्रह लोकांनी धरला.पण राजकारणात येण्याची वैभवची अजिबात रूची नव्हती.पण वैभव यांना राजकीय वारसा लाभला तो त्यांच्या आजी सुनंदा पिंपळशेंडेयांच्याकडून त्या तब्बल १५ वर्ष गावच्या सरपंच होत्या.लोकांच्या आग्रहाखातीर वैभव यांची राजकारणात एंट्री झाली.वैभव तसा कांग्रेस विचारधारेचा पण दरम्यान तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपा मध्ये प्रवेश केला.व २०२२ मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लढली.प्रतिस्पर्धी राजकारणातील मुरब्बी असल्याने .वैभव यांची पहिलीच निवडणूक काट्याची टक्कर ठरली.त्यांनी निवडणूक जिंकली. गावाच्या विकासासाठी अनेक कामे आणण्याचा व कामे करण्याचा सपाटा सुरू केला.गावकऱ्यांना ग्रामसभेतून बोलते करण्याचा काम केले.

अडल्या नडल्यांना मदत करण्याची व त्याची काम करण्याची हातोटी प्रभावी ठरत गेली.एका लहानशा गावात जनतेची सेवा करतांना पाहता पाहता तालुक्यातील जनतेच्या कामी तो पडू लागला.युवकांचे संघटन करून गावातील स्वच्छतेसाठी,व्यसनमुक्त गावांसाठी, पर्यावरण,सांस्कृतिक कामासाठी काम केले ते नक्कीच वाखान्यजोगे आहे.ग्रामीण भागातील युवकांनी वाचनसंस्कृती व स्पर्धा परीक्षेकडे वळले पाहिजे यासाठी वैभव पिंपळशेंडे यांनी चेक ठाणेवासना येथे वाचनालय बांधकामासाठी पाठपुरावा केला आणि यात त्यांना यश आले.तत्कालीन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ३० लक्ष रुपयाचे अत्याधुनिक वाचनालय मंजूर केले.वाचनालय पुर्णत्वास आले आहे त्याचा फायदा येथील युवक आपल्या भविष्यासाठी घेतीलच.यासोबतच अनेक खेळाडूंना त्यांच्या खेळ व खेळाडू वृत्तीला बळ मिळावे यासाठी त्यांनी सहकार्य केले.चेक ठाणेवासना येथील रेशन दुकानदाराकडून होत असलेली राशन चोरीच्या विरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं वैभवच्या नेतृत्वात.साधारण तीनशे ते चारशे लोकं तहसील कचेरीवर धडकली.अन् शेवटी त्या रेशन दुकानदारावर कारवाई करण्यात आली.यासोबतच चेक ठाणेवासना ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भूमीहीन,अल्पभूधारक शेतकरी,शेतमजूर व अत्यंत गरजू व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शासनाच्या अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्याच्या संदर्भात शासनाकडे मागणी लावून धरली होती.आणि याचा फायदा अनेक लोकांना झाला सुद्धा.लोकांच्या सेवेसाठी वैभव समर्पित आहे.ते यासाठी परिश्रम घेत आहे.

सामान्य व गोर-गरिबांचे काम सत्ताधाऱ्याकडून केल्या जात नाव्हते हे दुःख यामुळे सामान्यांच्या सेवेसाठी वैभव यांनी शेवटी पक्ष सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.यानंतर अनेकांनी त्याला पक्षात घेण्यासाठी सहमती दर्शवली मात्र काही दिवस वैभवने विचार करून माजी पालकमंत्री तथा विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार व सहकार नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसमध्ये प्रवेश घेतला.सत्ता व लाटेच्या विरोधात जाऊन परिवर्तनाचा एल्गार पुकारुन जनसामान्यांच्या हितासाठी काँग्रेसमध्ये घेतलेला प्रवेश अनेकांना विरोधकांना खुपलं तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याचे स्वागत केले.

.टोक गावात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून एक्कावन घरकुल मंजूर झाले.त्याचे काम सुरू झाले आहेत.या ठिकाणी दोन नद्या असताना सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पंचाईत व्हायची.पिण्याच्या पाण्यासाठी नदीवरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते.वैभवनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या समवेत पंचायत समितीवर मोठे आंदोलन केले.यादरम्यान अधिकाऱ्यावर गढुळ पाणी फेकण्याच्या कारणावरून त्याचेवर गुन्हे दाखल झाले आहेत.पण ते मागे हटले नाही या गंभीर समस्येची दखल घेत गंगापूर व टोक या दोन्ही गावात तात्काळ जलशुद्धीकरण केंद्र सुरू केले.

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत.सर्वच पक्षानी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.अश्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे निकटवर्ती असलेले इंजी.वैभव पिंपळशेंडे यांना कांग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यांना उमेदवारी मिळावी असे लोकांनाही वाटते.तो निवडणूकीत उतरला की त्याचा विजय नक्कीच आहे अशी पाठीवर थापही देत आहेत.त्यामुळे वैभव हे फारच भाग्यवान आहे असंच म्हणावं लागेल.यात चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचाही वैभव यांना आशिर्वाद लाभला आहे.राजकारणात जय पराजय लागलेलं आहे..वैभव पिंपळशेंडे यांना जय पराजयाचं काही एक लेनदेण नाही.कारण ते जिंकण्यासाठीच उतरले आहेत .
त्यामुळे व्ही फाॅर व्हिक्टरी ,व्ही फाॅर वैभव अशी एक ओळख पुन्हा त्याच्या नावासमोर पंचायत समितीच्या निवडणूकीच्या निमित्ताने नक्कीच कोरल्या जाईल.हा विश्वास पोंभुर्णा तालुक्यातील अनेक नागरीक व्यक्त करीत आहेत.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!