Sunday, June 28, 2026
spot_img

संदीप करपे ऍक्टिव्ह मोडवर सुधीर मुनगंटीवार यांची घेतली भेट माजी नगरसेवक अजय सरकार यांची साथ…

चंद्रपूर :

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते संदीप करपे हे पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात दिसू लागले असून त्यांनी अलीकडेच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. चंद्रपूरचे माजी नगरसेवक अजय सरकार यांच्या सोबतीने ही भेट पार पडली. या भेटीदरम्यान विविध राजकीय आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संदीप करपे हे गेल्या सुमारे 30 वर्षांपासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम करताना अनेक विकासकामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. काही काळ राजकीय हालचालींमध्ये तुलनेने शांत असलेले करपे आता पुन्हा सक्रिय झाल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या भेटीमुळे आगामी काळातील राजकीय समीकरणांबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील विकासकामे, स्थानिक प्रश्न तसेच भविष्यातील राजकीय दिशा याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
या प्रसंगी शैलेश बैस हे देखील उपस्थित होते. करपे यांच्या या भेटीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!