Sunday, June 28, 2026
spot_img

त्यांना भेटताच काँग्रेसचे “हे” नेते झाले भावुक ……..प्रसंग बघताच अनेक जण गहिवरले

चंद्रपूर:-

संसारात आलेल्या अडचणींनी त्यांना मुलाबाळांना घेउन गाव सोडावा लागला.करंजी,गडचिरोली ते मग नागपूर असा त्यांचा प्रवास स्थिरावला.पण त्यांनी कधी गावातल्या लोकांशी नाळ तोडली नाही.गाव सोडून मोठा काळ लोटला.पण नागपूरात त्यांच्या निवासस्थानी गावातील तरूण मंडळी येवोत कि जेष्ठ माणस.त्यांची आपुलकीने विचारपूस करायची.चहापणी करून जेवनासाठी आग्रह धरायचा.अनं मग अरे,आजच्या दिवस थांबूनच जा ना. म्हणून आपलेपणाची अनुभूती दयायची.अडचण आली कि मदत करायची.गावातला “त्या” कशा आहेत. “ते” कसे आहेत.त्यांच काय चाललय… हे विचारत तासनतास माहिती घेत बोलत बसायच.त्यांचा मुलगा राज्यातील बडा राजकीय नेता.पण त्यांनी कधीच आव आणला नाही.काही दिवसापुर्वीच त्यांच निधन झाल.अनं त्या होत काॅग्रेसचे जेष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई वडेट्टीवार.

चंद्रपूर जिल्हयातील करंजी हे काॅग्रेसचे जेष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच मुळ गाव.काल बौध्द समाज मंडळ,गुरूदेव सेवा मंडळ व गावक-यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी पाउनेदोन कोटी रूपयाचा विकासनिधी दिला.त्यातून विविध कामे करण्यात आलीत.त्याचाच लोकार्पण सोहळा विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आला.त्यांचे गावात आगमन होताच गावक-यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.गावातील प्रत्येक महत्वाच्या स्थळी त्यांनी भेट दिली.भेटीदरम्यान अनेक जेष्ठ महिलांनी त्यांच्या आईंची विशेषत्वाने आठवण केली.त्यांना त्यांच्या आईचा फोटो भेट दिला.हा सारा प्रकाराने विजय वडेट्टीवार काही काळासाठी कमालीचे भावुकझाले.हा प्रसंग बघून अनेकांनाही गहिवरून आलं.यावेळी त्यांच्या कन्या शिवानी,माजी आमदार सुभाष धोटे,संतोषसिंह रावत व अनेकांची उपस्थिती होती.

मित्रांनो, देव कर्मात शोधा….

आपल्या संतांनी,महापुरूषांनी आपणास समतेची,आपुलकीची,मदतीची शिकवण दिली आहे.चांगच्या कर्मातच खरा देव आहे.असेही त्यांनी सांगितले.माझ्या घरी रडत येणार माणूस हसत परततो.गेली पस्तीस वर्ष आपण केवळ जनसामान्यांच्या सेवेसाठी राजकारणाचा माध्यम म्हणून काम केल्याचे यावेळी आपल्या भाषणातून वडेटटीवारांनी सांगितल.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे करंजीत जन्मलेला एक सामान्य मुलगा आज राज्यात नेतृत्व करतोय अस म्हणत त्यांनी आपल्या गावाचा चेहरामोहरा बदलविण्याची ग्वाही दिली.

 

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!