Sunday, June 28, 2026
spot_img

आता आरपारची लढाई ………एमआयडीसी च्या विरोधात हजारोंचा एल्गार

चंद्रपूर
सुरजागड,कोनसरी प्रकल्प मोठा आशावाद ठरला होता.हजारो हेक्टर सुपीक जमिनी गेल्या. अन बदल्यात मिळाली काही रक्कम सोबत दहा तास हमालाची नोकरी. सकाळी आठ वाजता जायचे. दारू पिली कि नाही यासाठी फुकाफुकी करायची अन मगच तिथे एन्ट्री मारायची. गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतमालक राबता झालेत. पण प्रशासनाकडून रोजगार देण्याचा दावा केला गेला. आता गोंडपिपरी तालुक्यातील बारा गावाबाबत तीच स्थिती निर्माण झालीय. कोनसरी,सुरजागड च्या लोकांनी जी चूक केली ती आम्ही करणार नाही आम्ही शेतमालक आहोत.मजूर,गुलाम कसे होऊ असे सांगत बारा गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

पिढ्यानपिढ्या जी शेती आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ ठरली. तीच शेती उद्योगासाठी जाणार. आपण आता कायमसाठी भूमिहीन होणार या भीतीन गोंडपिपरी तालुक्यातील बारा गावातील हजारो शेतकरी बांधवांची पूरती झोप उडालीय. काहीही झाले तरी आम्ही आमची शेती देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
आंदोलन करण्यासोबतच आता त्यांनी कायदेशीर लढाई करण्याचा निर्धार केलाय.दरम्यान प्रशासनाच्या निर्णयविरोधात शेतकरी बांधवानी मोठ्या प्रमाणावर आक्षेप अर्ज उपविभागीय कार्यलयात दाखल करण्यात आले.याच मुद्द्याला घेत 8 मे रोजी बोरगाव येथे पहिली शेतकरी परिषद संपन्न झाली. यात तब्बल तीन हजार शेतकरी बांधवानी सहभाग घेतला.

चंद्रपूर जिल्हयाच्या सिमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील एमआयडीसी च्या माध्यमातून दहा हजार कोटी रूपयाची गुंतवणूक केलेला प्रकल्प उभारण्यात येणार आहे.दरम्यान या प्रकल्पाकरिता दहा हजार एकर शेती अधिग्रहीत करण्यात येणार आहे.शेतक-यांच्या सुपिक जमीनी हडपण्याचा हा डाव आहे.आम्हाला उदयोग नकोच,आमची शेतीच आम्हाला हवी आहे.अशी भुमिका बारा गावातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे.सुरजागड,कोनसरी येथील प्रकल्पाने तेथील शेतकरी बांधवांची झालेली फसवणूक आम्ही बघत आहोत. अशी चुक कुठल्याही स्थितीत आम्ही करणार नसल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.सदर जागा अधिग्रहण करण्याच्या प्रक्रियेची शेतकरी बांधवांना शेवटच्या क्षणापर्यत माहिती दिली गेली नाही.

अचानकपणे हि माहिती समोर आल्यानंतर शेतक-यांना मोठाच धक्का बसला.या प्रकल्पामुळे बारा गावातील हजारो शेतकरी भुमिहीन होणार आहेत.हा प्रकल्प शेतक-यांच्या जिवाशी उठला आहे.अशात आता शेतक-यांनी अतिशय आक्रमक भुमिका घेतली आहे.दरम्यान शेतकरी एकता संघर्ष समितीच्या माध्यमातून बोरगांव येथे आठ मे रोजी यासंदर्भातील पहिली शेतकरी परिषद घेण्यात आली.

या प्रा.डाॅ.सुरेश माने बोरगांवचे भुमिपूत्र प्रसिद्ध प्रबोधनकार अनिरूध्द वनकर अ.भा किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य अरूण लाटकर,अॅड.दिपक चटप यांनीं मार्गदर्शन केले आहे.अधिग्रहणाच्या प्रक्रियेला 90 दिवसांचा कालावधी अपेक्षित असतांना केवळ 30 दिवसांच्या कालावधीत हि प्रक्रिया गंुडाळण्याचा अटटाहास प्रशासनाकडून केल्या जात आहे.हा अतिशय अन्यायकारक प्रकार असून आम्ही कुठल्याही स्थितीत आमची शेती देणार नसल्याची भुमिका शेतक-यांनी घेतली आहे.दरम्यान शेतकरी एकता संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमीका मांडली आहे.यावेळी राजेश कवठे,शालीकराम माउलीकर,कमलेश निमगडे,ऍड. सचिन फुलझेले,शंकर पाल ,राहुल सोनटक्के,मारोती पाटील भोयर,यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!