चंद्रपूर:-
काॅग्रेस हे कडू कारल्यांप्रमाणे आहे.त्याला तुपात तळा किंवा त्यात साखर टाका ते कडूच असत.काॅग्रेसच्या या वृत्तीमुळे त्यांनी देशातल आपल जनसमर्थन गमावल आहे.सत्ता मिळविण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करित आहेत.पण येथील जनतेचे तेे मन जिंकू शकले नाहीत.गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने या देशातील गरीब,पिडीत,दलीत,आदिवासी,व मागासांच्या विकासाची नवी दालन निर्माण केलीत.अनेक योजना आणल्या.व लोकांना सक्षम बनविण्याचे काम केले.याउलट काॅग्रेसने केवळ जातविभाजनाच राजकारण केल.काॅग्रेसने नेहमीच आंतकवादाला समर्थन दिल.त्यांनी नुकतेच सादर केलेल्या घोषणापत्रात मुस्लीम लिग ची भाषा दिसून येत असल्याचा घनाघात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केला.भाजपच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी आज चंद्रपुरात आले होते.यावेळी ते बोलत होते.
सभास्थळी आमगन होताच मोदींनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरवात केली.माता महाकालीच्या पावन भूमीत मी शक्तीला नमन करतो,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो या वाक्यांनी त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात केली.उन्हाचा पार वाढत आहे.पण लोकांचा जोश उत्साह कमी झाला नाही.चंद्रपूरवासियांनी यावेळी पुन्हा “मोदी सरकार” असे मन बनविले आहे.चंद्रपूरच नाव सध्या संपुर्ण देशात पोहचल आहे.याच भूमीतून राममंदीरासाठी,संसदेसाठी सागवान पाठविण्यात आल.आपण एका गरीब परिवारातून आलो.त्यामुळे गरींबांच्या वेदना आपण चांगल्या समजू शकतो.असेही मोदी म्हणाले.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले,भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार,अशोक नेते,जेष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस,हंसराज अहीर,आमदार किशोर जोरगेवार यांची यावेळी उपस्थिती होती.चंद्रपूरच्या आजच्या सभेला भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि गर्दी बघून समाधान व्यक्त केल.
मोदींनी केले मुनगंटीवारांचे कौतूक
आजच्या सभेत मार्गदर्शन करतांना मोदींनी भाजपला चंदपूर,गडचिरोली या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचे कौतूक केले.मुनगंटीवार हे आपले जूने सहकारी आहेत.महाराष्ट्रात त्यांनी केलेेले काम हे अभिनंदनीय असल्याचे मोदी म्हणाले.



