Sunday, June 28, 2026
spot_img

गडचिरोलीत चिंता,नागपुरात मथंन

 

गडचिरोली:-
गडचिरोली जिल्हयाच्या विकासाकरिता आम्ही काय,काय केल नाही अस भाजप नेते सांगत आहेत.पण दुसरीकडे मात्र त्यांना कमालीचा विरोध सहन करावा लागत आहे.भुसंपादनाच्या मुदयावरून चामोर्शी तालुक्यात अशोक नेते यांचे “बॅनर” लावण्यास मनाई करून कार्यकर्त्यांना,नेत्यांना हाकलून लावण्याचा प्रकार समोर आला होता.यानंतर लोडशेडींगचा मुददा घेत पुराडा येथील शेतक-यांनी संताप व्यक्त केला.भाजपने “चारशे पार” चा नारा दिला आहे.एकएक जागा त्यांच्यासाठी महत्वाची आहे.गडचिरोलीतून होत असलेल्या विरोधामूळे त्यांच्यासमोर चिंतेचे सावट आहे.अशात काल गडचिरोलीच्या महत्वाच्या पदाधिका-यासोबत नागपुरात मंथन करण्यात आल्याची माहिती आहे.

गडचिरोली,चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपने अशोक नेते यांना तिस-यांदा संधी दिली आहे.तर दुसरीकडे काॅग्रेसचे डाॅ.नामदेव किरसान रिंगणात आहेत.किरसान यांच्या विजयासाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व अनेक नेते कामाला लागले आहेत.दुसरीकडे मात्र मित्रपक्ष “नेते”च्या प्रचारापासून दूर असल्याचे चित्र आहे.गडचिरोली जिल्हयातील अनेक गावात अशोक नेते यांना नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.अशात भुसंपादनाचा मुददा ऐेरणीवर आला आहे.लोडशेंडीग मुळे शेतीला पाणी मिळाल नाही. शेतपिकाच मोठ नुकसान होत आहे.हा मुद्दा घेत पुराडा गावातील नागरिकांनी जाब विचारला,संतापही व्यक्त केला.बॅनर लावणे तर दुरच राहिले.गडचिरोलीत निर्माण झालेली हि चिंता आता वरिष्ठाच्या लक्षात आली आहे.यामुळेच त्यांनी नागपूरात काल गडचिरोलीसंदर्भात मंथनासाठी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती आहे.दरम्यान यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आलापल्लीत ताबडतोब सभा घ्यावी लागली.

चंद्रपूरातील ‘‘भाष्य’’ गडचिरोलीत ‘‘संताप’’
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आणीबाणी व 1984 च्या दंग्याचा संदर्भ देत चंद्रपुरात अश्लाघ्य टिप्पणी केली होती.त्याचे लोण राज्यभर पसरले.आता गडचिरोलीतूनही त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला जात आहे.चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार,अशोक नेते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती.या सभेकरिता गडचिरोली जिल्हयातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.मोदी यांच्या सभेमुळे आपला मोठा फायदा होईल असे वाटले होते.मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यामुळं गडचिरोलीतूनही संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!