Saturday, October 10, 2026

“या” सरपंचाच चाललय तरी काय,…! आता दिला सुधीर मुनगंटीवारांना पाठिंबा

चंद्रपूर:
19 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची रंगतदार लढाई आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे.चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात तर आरपारचे राजकारण सुरू आहे.राज्याचे कॅबीनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार,आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात होत असलेल्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.काॅग्रेस,भाजपकडून सध्या विविध समाज,संघटना,लोकप्रतिनीधींचा पाठिंबा घेण्यासाठी कमालीची रस्सीखेच बघायला मिळत आहे. अशात पाठिंब्यावरून चंद्रपूरातील वढोली येथील सरपंच राजेश कवठे चांगलेच चर्चेत आले आहेत.एका दिवसाअगोदर गावात आलेल्या प्रतिभा धानोरकरांसोबत सार्वजनिक ठिकाणी भाषण ठोकणा-या कवठेंनी दुस-याच दिवशी मुनगंटीवारांच्या जाहीर सभेत विकासासाठी आपण त्यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.अनं मग काय आता त्यांच्या ताबडतोब बदललेल्या भूमीकेची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

राजेश कवठे हे गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील सरपंच आहेत.राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाचे एकनिष्ठ नेते होते.त्यांच्या नेतृत्वात गोंडपिपरी तालुक्यात अनेक आंदोलन झालीत.विविध प्रश्न कवठेंनी मार्गी लावले.पण दरम्यानच्या काळात राजेश कवठे यांनी आपली भूमीका बदलविली.पण पुन्हा ते पुन्हा राष्ट्रवादीत म्हणजे स्वगृही परतले.राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ते गोंडपिपरी तालुकाध्यक्ष म्हणून काम करित होते.
सध्या लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू आहे.गावागावात आपणाला जास्तीतजास्त लोकांपर्यंत कसे पोहचता येईल यासाठी मुनगंटीवार,धानोरकर प्रयत्नांची पराकाष्ठा करित आहेत.समाजातील अनेक घटकांचा आपल्या पक्षाला कसा पाठिंबा मिळेल यासाठीही जोरात नियोजन केल्या जात आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या काॅग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी नूकताच गोंडपिपरी तालुक्यात दौरा केला.अनेक गावांना भेटी देत त्यांनी वढोली गाव गाठल.तिथे त्यांची सभा झाली.या सभेत सरपंच राजेश कवठे सहभागी झाले,भाषणही ठोकल.शरदचंद्र पवार गट आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा असून आपल्या विजयासाठी आपण भक्कमपणे भूमीका घेऊ असे त्यांनी सांगितले.आमदार सुभाष धोटे,गोंडपिपरीच्या उपनगराध्यक्ष सारिका मडावी,शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख सुरज माडूरवार यावेळी उपस्थित होते
दरम्यान भाजपचे उमदेवार सुधीर मुनगंटीवार यांनी गोंडपिपरी तालुक्यातील गावागावात प्रचारयात्रा केल्या.यानंतर त्यांनी वढोलीत सभा घेतली.या सभेत मंचावर वढोलीचे सरपंच राजेश कवठे यांनी हजेरी लावली.सुधीर मुनगंटीवार हे विकासपूरूष आहेत.त्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या गावाचा मोठा विकास साधू शकतो अशा आशयाचे भाषण देत कवठेंनी सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा दिला.अगदी दोन दिवसात बदललेल्या या भूमीकेची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.

कवठे म्हणाले सरपंच आहे,माझ्यासाठी विकास महत्वाचा
मी गावचा सरपंच आहे.गावाचा विकास हा माझ्यासाठी महत्वाचा आहे.वढोली गाव हे अजूनही विविध समस्यांनी ग्रस्त आहे.प्रतिभा धानोरकरांकडून आपणास निमंत्रण आले होते.गावचा सरपंच म्हणून मी त्या सभेत गेलो होतो.पण आता आपण सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.मुनगंटीवार यांची विकासाची दृष्टी,त्यांचे नियोजन हे प्रेरणादायी आहे.ते जे शब्द देतात.ते पूर्ण करतात.यामूळ मी मुनगंटीवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे कवठे यांनी सांगितले.जातीपातीच्या राजकारणात विजय हा विकासाचाच होईल असेही ते म्हणाले.

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!