Sunday, June 28, 2026
spot_img

मग अपूर्ण इमारतीचे उदघाटन कशासाठी केले…..! चेतनसिंह गौर आमदार धोटेवर भडकले

चंद्रपूर :-

नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण व्हायचे होते.अशातही केवळ श्रेय व उदघाटन केवळ आपल्या हस्ते व्हायला हवे या अट्टाहासापोटी आमदार सुभाष धोटे यांनी आचारसंहितेच्या पूर्वी 26 जानेवारीचा मुहूर्त साधत इमारतीचे उदघाटन केले.उदघाटनानंतर काही दिवसात तातडीने काम पूर्ण होईल,व नगरपंचायतीचे कामकाज नूतन इमारतीत सुरु होईल अशी अपॆक्षा होती. मात्र ती पुरती फोल ठरली.आता या मुद्द्याला घेत भाजपचे नेते चेतनसिंह गौर यांनी आमदार सुभाष धोटे यांच्यावर निशाणा साधला आहे.

गोंडपिपरी नगरपंचायतीचा कारभार स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यासाठी सुरु करण्यात आलेल्या वाचनालयाच्या इमारतीत सुरु आहे.35 लक्ष रुपये खर्चून तयार करण्यात आलेले हे वाचनालय अनेकांसाठी उमेदीचे केंद्र बनले होते.पन नगरपंचायतीने याठिकाणी आपले बस्तान मांडले अनं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गरीब विध्यार्थाना वाऱ्यावर सोडले.येथील पुस्तकांचा साठा एका खाजगी इमारतीत धूडखात पडला आहे.पुस्तकांना उदरी लागली आहे. नगरपंचायत प्रशासनाला त्याचे देणेघेणे नाही. अशी स्थिती आहे.

आमदार सुभाष धोटे यांनी 26 जानेवारी रोजी नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाट्न केले. अवघ्या काही दिवसात याच कार्यालयातून प्रत्यक्ष कामकाज सुरु होईल अशी अपेक्षा होती. पण ती पुरतीच फोल ठरली. तिकडे नगरपंचायतीचे कार्यालय गेले कि, आमच्या अभ्यासाचा मार्ग मोकळा होईल असे विध्यार्थाना वाटले. पन अजूनही ते वेटिंगवरच आहेत.
काम पूर्ण व्हायचे होते मग उदघाटनासाठी कशाला एवढा अट्टाहास केला असे म्हणतं नगरपंचायतीचे भाजपचे गटनेते चेतनसिंह गौर यांनी आमदार सुभाष धोटे यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.दरम्यान आता या मुद्द्यांवरून भाजप कांग्रेस आमनेसामने येण्याशी शक्यता आहे. गोंड़पिपरी नगरपंचायतीच्या उदघाटनाच्या वेळी पालकमंंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव वगळण्यात आले होते.शेवटी नगर पंचायत प्रशासनाला नविन पत्रिका छापण्याची वेळ आली होतीवाचनालयाच्या इमारतीत नगरपंचायतीने बस्तान मांडल्याने गेल्या अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तैयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांत संताप आहे. याच तरुणाईचा मुद्दा घेत चेतनसिंह गौर हे आक्रमक झाले आहेत.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!