
चंद्रपूर:-
व्यापारी संघटनेच्या माध्यमातून गोंडपिपरी नगरात दरवर्षी मोठया उत्साहात तान्हा पोळा साजरा केला जातो.गेल्या विस वर्षापासून निरंतरपणे हा उपक्रम सुरू आहे.पण यात कधीच राजकारण आले नाही.यावेळी पार पडलेल्या तान्हा पोळा उपक्रमात भाजपचे राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांचा प्रचार करणारे कंपास चिमुकल्यांना वाटण्यात आले.व्यापारी संघटनेच्या बैठकीत याबाबीस विरोध झाला व एकमताने राजकीय हस्तक्षेप नको हा निर्णय घेण्यात आला असतांनाही हा प्रकार करण्यात आल्याने व्यापा-यांनी संताप व्यक्त केला आहे.गोंडपिपरीतील साई मशिनरी चे संचालक अजय माडूरवार यांनी सोशल मिडीयावर संतापदायक प्रतिक्रीया व्यक्त करित हा भाजपचा “रडीचा डाव” असल्याचे म्हटले आहे.यानंतर आता राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.अशात अनेक पक्षातील नेत्यांना आतापासूनच आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत.राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदांरांना याचा गेल्या वर्षभरापासून चांगलाच अनुभव येत आहे.भाजपने माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना राजुरा विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी दिली मग काय.त्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली.विधानसभा मतदारसंघात संघठनबांधणी केली.अनेक आपल्या समर्थकांना त्यांनी मोक्याच्या जागा दिल्यात.विविध दिन,रक्षाबंधन असे औचित्य साधीत त्याचा राजकीय फायदा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
गोंडपिपरीत रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात तर महिलांना टिफीनचे आमीष दाखवून पक्षप्रवेश करविण्यात आल्याचा आरोप झाला.महिला बाहेर जाउ नयेत म्हणून सभागृहाच्या मुख्य व्दाराला कुलूप ठोकण्यात आले होते.राजकीय प्रचारासाठी होत असलेला महिलांचा वाफर हा मुददा राजकीय वर्तुळात चर्चीला गेला होता.देवराव भोंगळे प्रचाराचे एकही मुददे सोडत नाही असा आरोप होत असतांना काल गोंडपिपरीत घडलेल्या एका प्रकाराने यावर शिक्कामोर्तब झाले.गोंडपिपरी येथे गेल्या विस वर्षापासून व्यापारी बंधूच्या माध्यमातून तान्हा पोळा अतिशय आंनदात साजरा केल्या जातो.
पण आजपर्यत या सणाला राजकीय स्पर्श नव्हता.गोंडपिपरी येथे तान्हा पोळा साजरा करतांना नियोजनादरम्यान काही भाजपच्या वतीने चिमुकल्यांना गिप्ट वाटण्यात येईल असे सुचविले होते.मात्र संघटनेच्या वतीने या उपक्रमात राजकीय हस्तक्षेप नको अशी भूमिका घेत याला नकार दिला.व्यापारी संघटनेनी नकार दिल्यानंतरही काल पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपने देवराव भोंगळे यांचा प्रचार करणारे कंपास वाटल्या गेले.कंपास अपूरे पडल्यानंतर कुपन देत नंतर कार्यालयातून कंपास देण्यात येतील असे सांगितले गेले.या प्रकारानंतर व्यापा-यांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे.गोंडपिपरी येथील साई मशिनरीचे संचालक अजय माडूरवार ंयांनी सोशल मिडीयावर एक संतापदायक पोस्ट करित या संपूर्ण प्रकाराचा निषेध केला आहे.हा भाजपचा रडीचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


