
गडचिरोली :-
राजकारणात कधी काहीही होउ शकते.रक्ताचे नाते कधी एकमेकांच्या विरोधात कधी उभे ठाकतील याची काही नेम नाही.बारामतीत लोकसभेच्या निवडणुकीत याचा अनुभव उभ्या महाराष्ट्रासह देशाने घेतलाय.आता यापेक्षाही भयानक राजकारणाची पुनरावृत्ती अहेरीत होतेय कि काय अशी राजकीय स्थिती निर्माण झालीय.अहेरी मतदारसंघातून तब्बल चारदा निवडून आलेल्या धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोर विरोधकांचे मोठे आव्हान असतांना आता त्यांना आप्तांशीही लढा दयावा लागणार आहे.त्यांची मोठी कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर या आपल्या वडीलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.राष्ट्रवादी काॅग्रेसच्या फुटींनतर धर्मराव आत्राम यांनी अजीत पवार गटाची साथ पकडली.त्यांनी बक्षिस म्हणून कॅबीनेट मंत्रीपदाची लाॅटरी लागली.यानंतर आता ज्या ज्या नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली त्यांना धडा शिकविण्यासाठी पवार गट सरसावला आहे.लोकसभा निवडणुकीत त्यांनी हे करून दाखविल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती ते करणार आहेत.यामुळे पवारांना सोडून गेलेल्या नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.शरद पवार गटाचे विदर्भातील नेते अनील देशमुख यांनी धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम तुतारी घेत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगीतले.आता हा धर्मरावबाबांना मोठाच दणका असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ देशभरात चर्चेत आला होता.राष्ट्रवादी काॅग्र्रेस पार्टीचे संस्थापक,जेष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आमनेसामने होत्या.आता राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.सारेच नेते यासाठी फिल्डींग लाउन बसले आहेत.अशात आता राज्याच्या शेवटच्या टोकावरील अहेरी विधानसभा मतदारसंघाचीच जोरात चर्चा होत आहे.अनं याला कारण ठरल आहे.राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम अन त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांच्यात निवडणूक लढविण्यावरून सार्वजनिक झालेला विषय.
गडचिरोली जिल्हयातील अहेरी विधानसभा मतदारसंघ हा धर्मरावबाबा आत्राम यांचा बालेकिल्ला राहिला आहे.या मतदारसंघातून ते तब्बल चारदा निवडून आले.विशेष म्हणजे चारदाही त्यांना मंत्रीपद मिळाले.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ते उभे राहण्यास इच्छुक होते.पण महायुतीकडून त्यांना संधी मिळाली नाही.आता राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका होणार आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत गडचिरोली मतदासंघात काॅग्रेसचे उमेदवार विजयी झाले.आत्रामांच्या अहेरी विधानसभा मतदारसंघातही काॅग्र्रेसला मतांची आघाडी मिळाली होती.हा धर्मराव आत्राम यांना मोठा धक्का मानला जात असतांना आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना आपल्या घरातूनच राजकीय संघर्षाला तोंड दयावे लागणार असल्याच्या चर्चा आहेत.त्यांची मोठी कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटाची तुतारी हाती घेत आपल्या वडिलाच्याच विरोधात निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा राजकीय गटात जोरात सुरू आहेत.आता येणा-या दिवसात या मतदारसंघात कोणकोणती राजकीय वळण येतात याकडे लक्ष लागले आहे.
धर्मरावबाबांचा संताप
काल दि.6 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार हे गडचिरोली जिल्हयातील अहेरी विधानसभा मतदारसंघात होते.त्यांनी यावेळी जनसन्मान यात्रा काढली.राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला.याप्रसंगी बोलतांना आत्राम कमालीचे संतापले होते.पक्षफोडी करणारे पक्ष आता माझ घर फोडण्याच काम करतोय अस म्हणत त्यांनी शरद पवार गटावर निशाने साधले.माझ्याकडे दुधारी तलवार आहे.वेळ आली तर हि तलवार बाहेर काढावी लागणार असा इशारा त्यांनी दिला.याप्रसंगी त्यांनी आपली कन्या भाग्यश्री यांच्यासह त्यांच्या जावयावरंही जहाल टिका केली.ज्या लोकांनी आपणास धोका दिला आहे.त्यांना प्राणहिता नदीत फेकून दया..अनं सरळ गोदावरी नदीच्या माध्यमातून समुद्रात पाठवा असे ते आपल्या भाषणात म्हणाले.मला पुन्हा एक मुलगी आहे.मुलगाही आहे.असेही ते बोलले.दरम्यान काल पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर आता अहेरी विधानसभा मतदारसंघात पितापूत्रीच्या संघर्षाचीच चर्चा होत आहे.
दादांचा ‘यु’टर्न
राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काॅग्रसचे नेते अजीत पवार यांनीही पितापूत्रीच्या संघर्षावर भाष्य केल.धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात मुलगी उभी राहणार अस कस चालेल.आत्रामांचा घर फुटू नये.ज्या बापानी जन्म दिला.त्यांच्याच विरोधात उभे राहणार का असे म्हणत त्यांनी तुम्हाला हे पटतय का असे त्यांनी उपस्थितांना विचारले.बारामतीच्या निवडणुकीत आपल्या बहिणीविरोधात आपल्या पत्नीला उभे करणा-या अजीत पवारांनीच आता इथे मात्र युटर्न घेतल्याने याची बरीच चर्चा झाली.



