
चंद्रपूर
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत.याकरिता नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.यातील सुरवातीचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे पक्षाची उमेदवारी मिळविणे आहे.अशावेळी पक्षश्रेष्ठींना प्रभावित करण्यासाठी इच्छुक उमेदवार जिवाचे रान करित आहेत.राज्याचे हेवीवेट मंत्री सुधीर मुनगंटीवार ज्या मतदारसंघात नेतृत्व करतात त्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील मारकवार यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.गेल्या वर्षभरापासून विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणा-या मारकरवार यांनी आता “जन प्रकाश” पदयात्रेचे नियोजन केले आहे.हि पदयात्रा त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरणार का.याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दणदणीत पराभव झाला होता.विशेष म्हणजे ते ज्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्या मतदारसंघात त्यांना मंताची मोठी पिछाडी मिळाली होती.या निकालानंतर काॅग्रेस नेत्यात कमालीचा उत्साह आहे.आपला विजय होउ शकतो.असा आशावाद ठेवीत अनेक काॅग्रेेस नेते मुनगंटीवारंासोबत दोन हात करण्यासाठी तयार आहेत.प्रकाश पाटील मारकवार हे काँग्रेस चे नेते आहेत.त्यांची राजकीय कारकिर्द मोठी राहिली आहे.1978 पासून ते सक्रिय राजकारणात आहेत.महाराष्ट्र प्रदेश युवक काॅग्रेस चे सचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राजकीय बळ मिळाले.चंद्रपूर जिल्हा खादीग्राम उदयोग मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली होती.यावेळी पवारांनी मारकवार यांना या मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले होते.यानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्यपदी ते निवडून आले.अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना पाच वर्ष मिळाली.मूल तालुक्यातील राजगड हे त्यांच गाव.या गावातूनच त्यांनी विकासाचा नवीन माॅडेल तयार केला.तो राज्यभर चर्चीला गेला.चंद्रपूर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षकार्यात योगदान दिले.
आपला उज्वल राजकीय प्रवास सुरू असतांना अनेकदा त्यांनी पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली.पण त्यांना संधी मिळाली नाही.पण त्यांनी कधीही पक्षाची साथ सोडली नाही.गेल्या काही वर्षापासून त्यांनी आपल्या कामांना गती दिली.लोकसभा निवडणुकीतही सक्रिय भूमीका बजावली.बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपल्या कामांचा झंझावत सुरू केला.गावागावात जनसंपर्क वाढविला.आता ते “जन प्रकाश”
पदयात्रा काढणार आहेत.आजपासून हि यात्रा सुरू होणार आहे.येत्या 15 सप्टेंबर पर्यत संपूर्ण मूल तालुका पिंजून काढण्यात येणार आहे.या यात्रेच्या माध्यमातून मारकवारंानी वेगळा प्रयोग करित आपली दावेदारी प्रबळ केली आहे.बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात अनेक काॅग्रेस नेते पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी तयारी करित आहेत.अशावेळी प्रकाश पाटील मारकवार यांनी आपली दावेदारी प्रबळ वाटत आहे.


