Sunday, October 11, 2026

भोंगळेंच्या प्रचाराला म्हटले होते ‘‘रडीचा डाव’’, संतापलेल्या भाजप नेत्याने दिले हे उत्तर

चंद्रपूर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता नेत्यांची लगीनघाई सुरू झाली आहे.मिळेल त्या माध्यमातून आपल्या नेत्याचा,पक्षाचा प्रचार करण्याची एकही संधी सोडली जात नाही.राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपचे देवराव भोंगळे यांना आतापासूनच आमदारकीचे स्वप्न पडू लागले आहेत.यासाठी त्यांनी गिप्ट मोहिम सुरू केलीय.नुकताच राजुरा विधानसभा मतदारसंघात मोडणा-या गोंडपिपरी नगरात तान्हा पोळा सण मोठया उत्साहात साजरा केला गेला.

व्यापारी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात कुठल्याही राजकीय पक्षाच्या उपक्रमाचा समावेश करू नये असे बजाविण्यात आले.पण भाजपने देवराव भोंगळे यांचे पोस्टर असलेले कंपास वाटले.यावरून नगरात संताप व्यक्त करण्यात आला.गोंडपिपरीचे व्यावसायीक अजय माडूरवार यांनी हा मुददा घेत भाजपचा हा रडीचा डाव असल्याचे म्हणत समाजमाध्यमातून तिव्र संताप व्यक्त केला होता.आता माडुरवार यांच्या आरोपाला घेत भाजप नेते समोर येत आहेत.भाजपचे शहराध्यक्ष तथा व्यापारी संघटनेचे सचिव चेतनसिहं गौर यांनी माडूरवारांच्या आरोपाला उत्तर दिले आहे.

भाजप नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असते.समाजातील अनेक घटकांना आम्ही मदतीचा हात देत असतो.व्यापारी संघटनेचा तान्हा पोळा सण मोठया उत्साहात साजरा केल्या गेला.हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मुख्य मार्गालगत असलेल्या आमच्या भाजप कार्यालयात आम्ही चिमुकल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कंपास वाटले.यात गैर ते काय असे गौर म्हणाले.भाजपच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबविल्या जात आहेत.सामान्य जनतेलाही यातून आनंद मिळत आहे.अनेक कार्यकर्ते आमच्याशी जुळत आहेत.आमच्या उपक्रमावर आरोप करणारे अजय माडूरवार हे व्यापारी तर आहेत.पण ते काॅग्रेसचे स्थानिक नेेते देखिल आहेत.भाजपचे नेते देवराव भोंगळे यांना मिळत असलेल्या समर्थनामुळे काॅग्रेसमध्ये अस्वस्थता असल्यामुळेच माडूरवार यांनी असले प्रकार चालविले असल्याचे चेतनसिंग गौर यांनी सांगितले.विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.अशात पक्षीय लढाई,आरोप प्रत्यारोपाच्या फे-या वाढल्या आहेत.राजुरा विधानसभा मतदारसंघात गोंडपिपरी तालुका हा अतिशय महत्वाचा मानला जातो.गोंडपिपरी तालुक्याने कौल दिलेल्या नेत्यालाच आमदारकी मिळाल्याचा इतिहास आहे.अशा स्थितीत अनेकांचे लक्ष आता गोंडपिपरीच्या राजकारणाकडे लागले आहे.

 

सबका साथ सबका विकास हा आमच्या पक्षाचा नारा आहे. हाच दृष्टीकोन ठेऊन आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत. गोंडपिपरी नगर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचा आमदार निवडून द्यायचा आहे.आम्ही आपले काम करीत असताना काँग्रेस ची विरोधी मंडळी केवळ सूड भावनेने बिनकामाचे वक्तव्य करीत आहे.अजय माडूरवारांचे विधान यातलाच एक भाग आहे.

चेतनसिंह गौर,शहर अध्यक्ष, भाजप,गोंडपिपरी

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!