
गडचिरोली
सध्या संपूर्ण राज्यात गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघाचीच जोरदार चर्चा होत आहे.राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या हाती तुतारी घेत त्यांच्याच विरोधात निवडणूूक लढण्याच्या चर्चा रंगल्या. मग काय संतापलेल्या आत्रामांनी आपल्या मुलीसंदर्भात नदीत फेकण्याची भाषा केली होती.आता हाच धागा घेत विरोधकांनी धर्मराव आत्रामाविरोधात मोहिमच उभी केली आहे.समाजमाध्यमातून मुलीला नदीत फेकण्याची भाषा करणारे धर्मराव आत्राम व महायुतीचे नेते महाराष्ट्रातील लाडक्या लेकींचे सरंक्षण करणार का अशा आशयाचा मजकूर पोष्ट करित संताप व्यक्त करित आहेत.यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेले ते विधान पून्हा एकदा विरोधकांनी आपल्या हातात घेतले आहे.यावरून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होतांना दिसून येत आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा माहोल तयार होत आहे.नेत्यांचे दौरे वाढले आहेत.आपल्या पक्षाला सर्वाधिक जागा कशा जिंकता येतील यासाठी जोरदार फिल्डींग लावली जात आहे.लोकसभा निवडणुकीत अपेक्षीत यश न मिळाल्याने महायूतीत चिंतेचे सावट आहे.अशात आता विधानसभा निवडणुकीत लोकसभेची भरपाई करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार हे परवा गडचिरोलीच्या दौ-यावर होते.यावेळी त्यांनी मंत्री धर्मराव आत्राम यांच्यासह जनसन्मान यात्रा काढली.अहेरी विधानसभा मतदारसंघातील आलापल्ली याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी बोलतांना धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्ष फोडणारे आता माझ घर फोडायला निघाले आहेत.असे सांगत शरद पवार यांच्यावर निशाना साधला होता.एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या जेष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर व त्यांच्या पतीला प्राणहिता नदीत फेकून गोदावरी नदीव्दारे समुद्रात पाठविण्याची भाषा केली होती.
भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांची तुतारी घेउन आपल्या वडिलांच्याच विरोधात लढणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत.याच पाश्र्वभूमीवर धर्मराव आत्राम यांनी हे विधान केल होत.यासंदर्भातील बातम्याही प्रसिध्द झाल्या होत्या.आता हाच मुददा घेत विरोधकांनी आत्राम यांच्या विरोधात मोहिम उभारली आहे.आपल्या मुलीला नदीत फेकण्याची भाषा करणारे राज्यातील लाडक्या मुुुलींचे काय सरंक्षण करणार असा आशय देत आत्राम यांचा विरोध करणारे पोस्टर चांगलाच वायरल करित आहेत.लाडकी बहिण योजना सुरू आहे.या योजनेला घेत विरोधकांनी आधीच बांेबाबोंब ठोकली होती.आता अशातच आपल्याच मुलीविरोधात सार्वजनिक मंचावरून नदीत फेकण्याची भाषा अजीत पवारांच्या पक्षासह महायुतीलाही चांगलीच अडचणीची ठरू शकते असे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.



