Sunday, June 28, 2026
spot_img

काॅग्रेस,शेतकरी संघटनेचे झाले ‘‘फिक्स’’….”लक्ष्य” वेधण्यासाठी भाजप नेत्यांचे ‘‘सिक्स’’

 

चंद्रपूर

विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.लवकरच निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळणार आहे.अशात नेते यासाठी सज्ज आहेत.राजुरा विधानसभा मतदारसंघात एकीकडे काॅग्रेस,शेतकरी संघटनेचे उमेदवार फिक्स असतांना दुसरीकडे भाजपत मात्र उमेदवारीसाठी कमालीची रस्सीखेच दिसत आहे.आपलीच उमेदवारी कशी प्रबळ ठरू शकते हे दाखविण्यासाठी राजु-यात नेत्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून सिक्स लगविण्याचा प्रयत्न चालविला आहे.यात कोणता नेता सिक्सर मारणार अनं कोण कॅचआउट होणार याकडे राजकीयांचे लक्ष आहे.

राजुरा विधानसभा मतदारसंघात आमदार सुभाष धोटे हे सध्या नेतृत्व करित आहेत.ते दुस-यांदा आमदार आहेत.आता पुन्हा एकदा विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी ते सज्ज आहेत.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या सुभाष धोटे यांची उमेदवारी फिक्स आहे.सध्या राज्यातील विविध राजकीय सर्व्हेत महाविकास आघाडीच सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.नवनिर्वाचीत खासदार प्रतीभा धानोरकर यांनी एका सभेत आमदार सुभाष धोटे हे येणा-या काळात मंत्रीमहोदय असतील असे विधान केले होते.लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसने मोठा विजय मिळविला होता.यात राजुरा विधानसभा मतदारसंघात आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात काॅग्रेसला मतांची मोठी आघाडी मिळाली होती.यामुळे काॅग्रेस कार्यकर्त्यात उत्साह आहे.सोबतच आमदार सुभाष धोटे यांनी विकासकामांचा झपाटा लावला आहे.

माझी हि शेवटची निवडणूक असेल असे मागील निवडणुकीत सांगणारे अॅड.वामनराव चटप पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत.त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.अनेक समुदायांना सोबत जोळण्यासाठी त्यांनी फिल्डींग लावली आहे.2019 मध्ये पार पडलेल्या राजुरा विधानसभा मतदारसंघाती निवडणुकीत सुभाष धोटे व वामनराव चटप यांच्यात कमालीची रस्सीखेच बघायला मिळाली होती.मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यत कोण बाजी मारणार हे सांगता येत नव्हत.शेवटी या लढतीत सुभाष धोटे यांनीच बाजी मारली.अडीच हजार मताने त्यांचा विजय झाला.धोटे,चटप यांच्या फिक्स असलेल्या उमेदवारीमुळे पुन्हा एकदा 2019 ची पुनरावृत्ती होणार का याबाबतची चर्चा आता रंगू लागली आहे.

राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजप कुणाला उमेदवारी देणार याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.या मतदारसंघात पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलविणारे माजी आमदार संजय धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर,माजी जि.प अध्यक्ष देवराव भोंगळे या तिघापैकी कोणत्या नेतृत्वावर पक्ष विश्वास टाकणार हे बघणे देखिल औत्सुकतेचे ठरणार आहे.
संजय धोटे यांनी विधानसभा मतदारसंघात शेतकरी संवाद यात्रा काढली.यामाध्यमातून त्यांनी आपले दावेदारी दाखवून दिली.दुसरीकडे सुदर्शन निमकर यांच्या वाढदिवसानिमीत्ताने विविध उपक्रम राबवित त्यांच्या समर्थकांनी बहुसंख्येने शक्तीप्रदर्शन केले.देवराव भोंगळे हे देखिल विधानसभा मतदारसंघात सारखे फिरत आहेत.विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.महायुतीच सरकार कायम ठेवण्यासाठी भाजप जिवाचे रान करित आहे.अशात त्यांना एकएक विधानसभा मतदारसंघावर विजय मिळवायचा आहे.यामुळे पक्ष विनर कॅडेड कोण यावर भर देणार आहे.अशास्थितीत उमेदवारी मिळविण्यात कोणता नेता बाजी मारणार याकडे भाजपच्या गोटाचे लक्ष आहे.

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!