
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हयातील गावागावातील लाडक्या बहिणींना राज्याचे वने,सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज एक “गूड न्यूज” दिलीय.चंद्रपूर येथे कृषी विभागाच्या जागेवर 80 कोटी रूपये खर्चुन समृध्द बाजारपेठ तयार होणार आहे.यात केवळ गावागावातील महिला बचत गट,शेतकरी बचत गटाने निर्माण केलेल्या वस्तूची मोठी बाजारपेठ निर्माण केल्या जाणार आहे.एवढेच नव्हे तर गावातील सरकारी जागेवर आता माॅल उभारल्या जाणार आहे.यात बचत गटांना मोठी संधी अशणार आहे.आज चंद्रपूरातील पोंभूर्णा येथे माविम च्या माध्यमातून महिला संमेलन घेण्यात आले यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी हि माहिती दिली.
आपण केवळ विकासाच काम केल आहे.मी जेव्हा पोंभुर्ण्यात आलो तेव्हा येथील स्थिती काय होती हे सर्वांनाच माहित आहे.पण आता “पी” फाॅर पोंभुर्णा विकासाच माॅडेल ठरल आहे.सुरवातील “पी” फार पूणे अस म्हटल जायच पण आता हे चित्र बदलल आहे.बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या कामांना अधिक गतीमान करण्यासाठी आपण काही उपक्रम सुरू केले आहेत.यामाध्यमातून येणा-या दिवसात या जिल्हयातील महिला या सर्वशक्तीमान होतील यात शंका नाही.
भारतरत्न महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे एक कंद्र बल्लारपूरजवळ उभारले जाणार आहे.या केंद्राच्या माध्यमातून विविध 72 प्रकारचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण तरूणींना दिल्या जातील.दिवंगत सुषमा स्वराज यांच्या नावाने साडेअकरा कोटी रूपयाचे तर बाबा आमटे यांच्या नावाने आनंदवनात 15 कोटी रूपये खर्चुन भव्यदिव्य कौशल्य विकास केंद्र होणार आहे.अशी माहिती यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना हि महिलांसाठी अभिनव योजना आहे.या योजनेमुळे विरोधकांना झोप लागणे कठीण झाले आहे.हल्ली या योजनेवरून ते टिकेचे बाण सोडताहेत.पण राज्यातील लाडक्या बहिणी त्यांना आता त्यांची जागा दाखविणार आहेत.लाडक्या बहिणींना मी आश्वस्त करतो कि,भाऊ म्हणून माझी आठवण करा मी तुमच्या प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी तप्तर असेल अशी ग्वाही यावेळी मुनगंटीवार यांनी दिली.



