Sunday, June 28, 2026
spot_img

9़61 कुटुंबियांना मिळणार हक्काचे घरकूल,मुनगंटीवारांच्या पुढाकारातून बारा कोटींचा निधी मंजूर

 

चंद्रपूर

एकीकडे जातीपातीच गलिच्छ राजकारण सुरू आहे.अलीकडल्या काळात सार्वजनिकरित्या त्याची अनुभूती समाजव्यवस्थेत दिसून आलीय.जातीसाठी माती खाणा-यांना चौफेर टिकेला सामोरे जावे लागले होते.पण खरा नेता हा सर्व समाजाच्या सर्वागिंण विकासाचे काम करतो.त्यांच्या व्यथा,वेदना जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.राज्याचे वने सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संपूर्ण वाटचालीचा केंद्रबिंदू विकासाच्या भोवतीच फिरतो.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानंतर आता हजारो कुटुंबियांना मोठाच दिलासा मिळणार आहे.बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील तब्बल 961 गरीबांना हक्काचे घरकूल मिळणार असून त्यांचे स्वप्न आता साकार होणार आहे.याकरिता यशवंतराव चव्हाण घरकूल योजनेअंतर्गत 12 कोटी 49 लक्ष 30 हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

पोंभुर्णा तालुक्यातील 500 लाभार्थ्यांना घरकुल
जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल, आणि पोंभुर्णा तालुक्यातील 961 लाभार्थ्यांना यशवतंराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुलचा लाभ होणार आहे. यामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील 500 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार असून यात चेक हत्तीबोडी लाभार्थी (60), घाटकुळ (106), सातारा भोसले (11), जामतुकूम (55), चेक आंबेधानोरा (22), मोहाळा रै (26), जुनगाव (42), बोर्डा झुल्लुरवार (12), बोर्डा बोरकर (127), चिंतलधाबा (16), नवेगाव मोरे (16) आणि फुटाणा मो येथील (7 लाभार्थी) लाभार्थ्यांचा समावेश आहे.

मुल तालुक्यातील 376 लाभार्थ्यांना घरकुल
मुल तालुक्यातील 376 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार असून यात चिमठा गावातील (27 लाभार्थी), विरई (33), गवराळा (28), उश्राळा (17), चिरोली (42), डोंगरगाव (115), सुशी (99), आणि राजगड येथील (13 लाभार्थी) आहे.

चंद्रपूर तालुक्यातील 85 लाभार्थी
यात चंद्रपूर तालुक्यातील 85 लाभार्थी आहेत. यात अजयपुर येथील (1 लाभार्थी), चिचपल्ली (21), मामला (11), चोरगाव (3), जुनोना (12), नागाळा म. (3), निंबाळा (9), पिंपळखुट (1), चेक पिंपळखुट (1), पिपरी (5), मोहर्ली (2), वरवट (12) आणि सिदूर येथील (4) लाभार्थ्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!