चंद्रपूर :-
खरा लोकप्रतिनीधी जनतेच प्रतिनीधीत्व करतो.सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो.पण अलीकडे असे लोकप्रतिनीधी दुर्मीळ होतांना दिसत आहेत.अशावेळी राज्याच्या शेवटच्या टोकावरील राजुरा विधानसभा मतदारसंघातील आमदार सुभाष धोटे यांनी विधानसभेत नागरिकांच्या अनेक समस्यांना घेत तब्बल 333 प्रश्न विचारले आहेत.विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांच्यानंतर सर्वाधिक प्रश्न विचारणारे ते जिल्हयातील पहिले आमदार ठरले आहेत.मुंबईच्या एका संस्थेने नुकताच आमदारांच्या प्रश्न विचारण्याच्या बाबीवर अहवाल सादर केला यातून हि माहिती समोर आली आहे.सध्या राज्यात निवडणुकांचे वातावरण आहे.अशावेळी हा अहवाल आमदार सुभाष धोटे यांच्यासाठी दिलासा देणारा ठरला आहे.
आमदार सुभाष धोटे हे राजुरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनीधीत्व करतात.ते काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम बघतात.त्यांच्याच नेतृत्वात पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोठ यश मिळाल होत.दोनदा आमदार झालेले धोटे पून्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.त्यांच्यासमोर त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी वामनराव चटप यांचे आव्हान असल्याचे सांगितल्या जात आहे.भाजप उमेदवार मागील निवडणुकीत या मतदारसंघात तिस-या स्थानावर राहिले होते.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच मुंबईतील एका संस्थेने आमदारांची कामगिरी दर्शविणारा अहवाल प्रसिध्द केला आहे.यात विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार यांनी सर्वाधिक 380 प्रश्न विचारले होते.त्यांच्याखालोखाल जिल्हयातून सर्वात जास्त प्रश्न विचारण्या आमदार सुभाष धोटे यांचा नंबर लागला आहे.त्यांनी तब्बल 333 प्रश्न विचारले आहेत.विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या अनेक मागण्यांची सरकारला दखल घ्यावी लागली होती.आमदार असतांना प्रतीभा धानोरकरंानी 316 प्रश्न विचारले आहेत.आता या अहवालाचा आधार घेत काॅग्रेस कार्यकर्ते आपल्या नेत्यांची कामगिरी लोकापर्यत पोहचवू लागले आहेत.



