Sunday, June 28, 2026
spot_img

बावनकुळेंनी दिला होता ग्रिन “सिग्नल” पण,शिंदेचे खासमखास किशोर जोरगेवार वाजविणार “तुतारी”


चंद्रपूर

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली अनं राजकीय वातावरण चांगलेच पेटायला लागले.महायुतीसमोर सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान आहे.तर महाविकास आघाडीला परिवर्तन अपेक्षित आहे.अशात एकएक जागा जिंकण्यासाठी दोन्ही गटाने कंबर कसली आहे.चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे भाजप प्रवेश करणार अनं निवडणूक लढणार अशी चर्चा दरम्यानच्या काळात रंगली होती.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत ग्रिन सिग्नल दिला होता.पण आता जोरगेवार शरद पवारांची तुतारी वाजविण्यासाठी तयार आहेत.माध्यमांशी बोलतांना त्यांनीच हि माहिती दिली.चंद्रपूरची जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला सुटली तर आपण तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र असे झाल्यास काॅग्रेसकडून चंद्रपूरची जागा लढविण्यासाठी तयारी करणा-या अनेक उमेदवारांचा चांगलाच हिरमोड होउ शकतो.

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनु.जाती प्रवर्गासाठी राखीव झाला.अनं सुधीर मुनगंटीवार यांना हा मतदारसंघ सोडावा लागला.यानंतर सातत्याने या मतदारसंघातून भाजपचे पार्सल असणारे नाना शामकूळे दोनदा निवडून आले.तिस-यांदा मात्र किशोर जोगरेवार यांनी अपक्ष निवडणूक लढविली अनं जिंकून दाखविली.चंद्रपूरच्या नागरिकांना दोनशे युनीट विज देण्यात येईल हा नारा देत ते मागील निवडणूकीत उभे होते.ते आमदार तर झाले.मात्र चंद्रपूरचे नागरिक अदयापही दोनशे युनीटचा मुददा विसरले नाहीत.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना पदावरून खाली व्हावे लागले होते.तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार गुवाहाटीला गेले होते. यावेळी “खोक्यां”चा मुद्दा चांगलाच गाजला होता.अशा वेळी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे देखील गुवाहाटीला पोहचले होते. तेव्हापासूनच किशोर जोरगेवार हे मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांचे खासमखास झाले होते. पण राजकीय बदलती समीकरण काय काय करायला लावतील याचा नेम नाही. शिंदेंचे खास, भाजपडकून ऑफर पण जोरगेवारांनी शेवटी शरद पवारांनाच पसंती दिली आहे.अशा वेळी आता काय काय होत हे बघणं रंजक ठरणार आहे.

यावेळी हा मतदारसंघ काॅग्रेसच्या वाटयाला यावा यासाठी नेतेमंडळींनी फिल्डींग लावली आहे.या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काॅग्रेस नेत्यांनी मोठी लाईन आहे.पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना फोन करून त्यानी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवावी असे सुचविले.त्यांचा हा प्रस्ताव जोरगेवारांना मान्य आहे.पण हि जागा राष्ट्रवादी ला सुटेल तेव्हाच आपली तयारी असेल असेही जोरगेवारांनी माध्यमांना सांगितले.

 काॅग्रेसचे काय…..!

महाविकास आघाडीत सध्या काॅग्रेसच मोठया भावाच्या भूमिकेत आहे.सर्वात जास्त जागा तेच लढविणार असल्याच्या चर्चा आहेत.अशा स्थितीत विदर्भातून आपल्या वाटयाला जास्त जागा मिळविण्यासाठी नेते कामाला लागले आहेत.गेल्या अनेक निवडणूकांत काॅग्रेसला चंद्रपूरची जागा जिंकता आली नाही.पण लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरातून आघाडी मिळाल्याने काॅग्रेसचा आशावाद वाढला आहे.अशावेळी या जागेवर काॅग्रेसने दावा केला असतांना आता मात्र शरद पवार गटाने एक पाउल पूढे टाकले आहे.अशा स्थितीत ऐन वेळेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून चंद्रपूरबाबत काय निर्णय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.

 

 

RELATED ARTICLES
spot_img

Live News

Most Popular

error: Content is protected !!