
चंद्रपूर
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे.कुठल्याही स्थितीत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत.एकीकडे महायुतीपूढे सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान आहे.दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर काॅग्रेस व महाविकास आघाडीला सत्तापरिवर्तनाची मोठी अपेक्षा आहे.अशात एक एक जागांसाठी चढाओढ सुरू आहे.विदर्भात काॅग्रेसची ताकद वाढली आहे.अशा परिस्थितीत जास्तीत जास्त जागा आपणाकडेच ठेवण्यासाठी काॅग्रेस नेते कामाला लागले आहेत.जिंकणारा उमेदवाराला पसंतीक्रम दिल्या जाणार आहे.चंद्रपूरातील बल्लारपूर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या निवडणुकीत दणदणीत पराभवाचा सामना करावा लागला होता.त्यांच्याच मतदारसंघात त्यांना मतांची मोठी पिछाडी मिळाली होती.यामुळे काॅग्रेसचा उत्साह दूणावला.विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी काॅग्रेसने फिल्डींग लावली आहे.अशावेळी मुनगंटीवारांच्या विरोधात काॅग्रेस कुणाला पसंती देणार याचीच चर्चा मतदारसंघात होत आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व काॅग्रेस नेत्या डाॅ.अभिलाषा गावतूरे हे दोन नावे शेवटी अग्रक्रमावर आहेत.अशावेळी या दोघांपैकी पक्ष कुणावर विश्वास टाकणार याकडे राजकीयांचे लक्ष आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनु.जाती प्रवर्गासाठी राखीव झाला.अनं सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरकडे आपला मोर्चा वढविला.गेली तिन टर्म ते या मतदारसंघाचे नेतृत्व करित आहेत.आता पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ते सज्ज आहेत.लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पून्हा उभारी घेण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी चालविली आहे.लोकसभा अनं विधानसभा मतदारसंघाचे समीकरण वेगळी असतात.पण चालू परिस्थीतीचा आढावा लक्षात घेता यावेळेस मुनगंटीवार यांना वाटते तेवढी हि निवडणूक सोपी नसल्याचे बोलल्या जात आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काॅग्रेसकडून अनेक इच्छुक आहेत.पण शेवटच्या टप्प्यावर आता केवळ दोघातच उमेदवारीसाठी स्पर्धा होत आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅेकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत अनं काॅग्रेस नेत्या डाॅ.अभिलाषा गावतूरे यापैकी पक्ष कुणाला संधी देईल याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.रावत हे अनेक वर्षापासून काॅग्रेससोबत काम करित आहेत.मूल येथील रहिवाशी असलेल्या रावत यांनी विविध पद भूषविली आहेत.विजय वडेटटीवारांचे ते खासमखास आहेत.पण सध्याची परिस्थीती बघता त्यांनी खासदार प्रतीभा धानोरकर, काॅग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासोबत जुळवणी केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून ते मतदारसंघातील गावे पिंजून काढीत आहेत.अनेक काॅग्रेस कार्यकर्त्यांची टिम त्यांच्यासोबत आहे.
दुसरीकडे डाॅ.अभिलाषा गावतूरे यांची दावेदारीही प्रबळ मानली जात आहे.फुले,शाहू,आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून त्यांनी या भागात आपला पाया रोवला आहे.त्या स्वत कुणबी असल्या तरी त्यांचे पती माळी समाजातून येतात.बल्लारपूर मतदारसंघात माळी समाजाची संख्या लक्षणीय आहे.अदिवासी,दलीत बांधवांची गावतूरेप्रती आपूलकीची भावना त्यांना कामात येउ शकते.असे राजकीय जाणकारांचे मत आहे.अशावेळी या मतदारसंघातून आपणालाच उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
येत्या एक दोन दिवसात महाविकास आघाडी आपले उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.अशावेळी बल्लारपूर मतदारसंघात काॅग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.मुनगंटीवारांच्या मतदारसंघात त्यांना कोण दोन हात करू शकतो.याच्या ब-याच चर्चा होत आहेत.



